घरमहाराष्ट्ररेल्वे तिकिटांवर सेवा शुल्क

रेल्वे तिकिटांवर सेवा शुल्क

Subscribe

प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री

रेल्वेचे तिकीट ऑनलाईन बुक करणार्‍यांसाठी एक निराश करणारी बातमी आहे. येत्या काळात रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बूक केल्यास प्रवाशांना सर्व्हिस चार्ज लागणार आहे. त्यासाठी रेल्वे बोर्डाने आय-आरसीटीसीला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना रेल्वेचे तिकीट ऑनलाईन बुक करताना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. प्रवाशांच्या खिशात कात्री लागली असताना आयआरसीटीसीला मात्र वर्षाला ५०० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजीटल इंडियाची घोषणा केल्यानंतर केंद्र सरकारने २०१६ मध्ये ऑनलाईन ट्रेन बुकींगला सर्विस चार्जेसमधून सूट दिली होती. नोटबंदीनंतर 23 नोव्हेंबर 2016 पासून 31 मार्च 2017 पर्यंत ऑनलाईन तिकीट बुकींगच्या सर्व्हिस चार्जमध्ये सूट देण्यात आली होती. त्यानंतरही सूट अशीच कायम ठेवली होती. यापूर्वी रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकींगवर सर्व्हिस चार्ज आकाराला जात होता. स्लीपर वर्गासाठी २० रुपये तर वातानुकूलित वर्गासाठी ४० रुपये सेवाशुल्क मोजावे लागते होते. मात्र सर्व क्षेत्रात डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी हा सेवाशुल्क माफ करण्यात आला होता. हा सर्व्हिस चार्ज रद्द केल्यामुळे आयआरसीटीसीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. वर्षाला 500 कोटी रुपयांचे नुकसान आयआरसीटीसीला सोसावे लागत होते.

- Advertisement -

मात्र आता रेल्वे बोर्डानी आयआरसीटीसीला ऑनलाईन तिकिट बुकिंगवर सर्व्हिस चार्ज स्वीकारण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे जे 500 कोटी रुपयांचे नुकसान व्हायचे ते आता होणार नाही.
आयआरसीटीकडून लवकरच होणार घोषनणा

ऑनलाईन व्यवहारात वाढ होत असताना, आता रेल्वे बोर्डाने आयआरसीटीसीला सर्व्हिस चार्ज आकरण्याची मुभा दिली आहे. आयआरसीटीकडून अभ्यास करून लवकरच प्रवाशांकडून सर्व्हिस चार्ज वसूल करणार आहे. त्याची लवकरच घोषणा करण्यात येईल, अशी माहिती आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. मात्र या निर्णयामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होणार आहे.

- Advertisement -

13 लाख प्रवाशांना फटका
सध्या देशभरातून दररोज 13 लाखांपेक्षा जास्त प्रवासी ऑनलाईन तिकीट बुकिंग करतात. सर्व्हिस चार्ज लावला तर इतक्या प्रवाशांना त्याचा फटका बसणार आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -