घरमहाराष्ट्रनाशिकसंगमनेरात दिवसभरात सात कोरोनाबाधित

संगमनेरात दिवसभरात सात कोरोनाबाधित

Subscribe

सिन्नरमधील एकाचा समावेश; स्त्राव संकलन केंद्राचा परिणाम

संगमनेरमध्ये कोरोनाबाधितांचा दररोज क्रिकेटच्या धावफलकाप्रमाणे वाढत चालला आहे. शनिवारी दिवसभरात संगमनेरमध्ये तब्बल सात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले यात सिन्नरच्या कणकोरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. आत्तापर्यत शहरालगतच्या उपनगरापर्यत सिमीत असलेल्या कोरोनाने आता शहराच्या मध्यवस्तीत शिरकाव केला आहे. यामुळे प्रशासन आणि संगमनेकरकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

शनिवारी पहाटेच भारतनगरसह शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मोमीनपुऱ्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचा अहवाल येऊन थडकला. मोमीनपुऱ्यालगत शहर पोलिस ठाणे, तहसील कचेरी, दुय्यम निबंधक कार्यालय आणि न्यायालयीने इमारती आहेत. त्यामुळे मोठ्या लोकसंख्येला यामुळे धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसभरात भारतनगरमध्ये ३३ वर्षाच्या तरुणासह ५४ वर्षीय महिला बाधित आढळली आहे. हे दोघेही आधीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत. तर मोमीनपुरा येथील ७१ वर्षीय व्यक्तीचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णाला कोरोनाची बाधा कशी झाली याचा अद्याप उलगडा झालेला नाही. याशिवाय निमोण येथेदेखील आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून हा रुग्णदेखील बाधित व्यक्तीच्या संपर्कातील असल्याची माहिती मिळाली. तर सिन्नरच्या कणकोरी येथील ७५ वर्षीय एक व्यक्ती तपासणीसाठी संगमनेरमध्ये आली होती. येथील ग्रामीण रुग्णालयातील तपासणीत या व्यक्तीत कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याचा स्त्राव ग्रामीण रुग्णालयातील खासगी स्त्राव संकलन केंद्रात घेण्यात आला होता. त्याचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

संगमनेरातील बाधित रुग्ण संख्या आता ३७ वर गेली आहे. यातील पाच रुग्णांचा यापुर्वी मृत्यु झाला. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरला करोनाने चांगलेच ग्रासले आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या संगमनेरमध्ये अाहे. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने संगमनेर करोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. आत्तापर्यत नायकवाडपुरा, इस्लामपुरा, रहेमतनगर, कुरणरोड, मदिनानगर, भारतनगर या परिसरापुरता सिमीत असलेल्या परिसरातुन करोनाने आता शहराच्या मध्यवस्तीतील मोमीनपुरा भागात शिरकाव केला आहे. यामुळे संगमनेरकरांना अधिक सतर्कतेने वागण्याची गरज आहे.

दरम्यान संगमनेर शहरात रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णाचा रहिवास असलेला परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. सकाळपासून अधिकाऱ्यांची या भागात वर्दळ वाढली होती. पालिका प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना या भागातील लोक दाद देत नसल्याने महसूलच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली. मात्र त्यांच्यासोबतदेखील येथील नागरिकांनी गोंधळ घातल्याची माहिती आहे. तहसीलदार आणि संबधितांत वाद झाले. संबधितांकडून प्रशासनाला सहकार्य केले जात नसल्याचे दिसून आले.

- Advertisement -

संगमनेरात सुरु झालेल्या स्त्राव संकलनाचा फायदा

संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पुढाकारातून घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात खासगी स्त्राव संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे. याआधी संशयित रुग्णाचे स्त्राव घेण्यासाठी त्यांना नगरला पाठविले जात असे, तेथे केवळ हायरिक्समधील लोकांचे स्त्राव घेतले जात, तर अन्य संशयितांना परत पाठविले जात. या स्त्राव संकलन केंद्रामुळे आता संशयितांचे स्त्राव घेणे शक्य झाले असून त्यांची तपासणी खासगी लॅबद्वारे केली जात आहे. येथे स्त्राव घेण्यास सुरुवात झाल्याने बाधितांची संख्यादेखील वाढत आहे. नागरिकांनी जास्त त्रास होण्यापुर्वीच रुग्णालयातुन तपासणी केल्यास पुढील धोका टळण्यास मदत होईल, असे तहसीलदार अमोल निकम यांनी ‘आपलं महानगर’शी बोलतांना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -