भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरले पालघर!

earthquakes in Palghar district
भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरले पालघर!

पालघरमध्ये मध्यरात्रीपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना भीतीच्या सावटाखाली जगावं लागत आहे. मध्यरात्री ते पहाटेपर्यंत सात भूकंपाचे धक्के बसले आहेत. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री जवळपास सौम्य, मध्यम स्वरुपाचे भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वात मोठा धक्का ४.२ रिश्टर स्केलचा होता.

पालघर जिल्ह्यात गेल्या ४ तारखेपासून सुरू असलेले भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. तलासरी, कास, धानिवरी, चिंचणी, धुंदलवाडी, बोर्डी, आंबोली, चिंचले, दापचरी, सासवंद आणि इतर आजूबाजूचा परिसर भूकंपाने हादरला आहे. तसेच पुन्हा एकदा सुरू झालेल्या या भूकंपाच्या सत्रामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाच्या सत्रामुळे अनेक नागरिकांना रात्रभर घर सोडून बाहेर झोपावं लागत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आहे. तर दुसरीकडे भूकंपाने धक्क्यांनी आपलं डोकं वर काढलं आहे.

मध्यरात्रीपासून सात भूकंपाचे धक्के

३ वाजून २९ मिनिटांनी – ३.५ रिश्टर स्केल
३ वाजून ४३ मिनिटांनी – २.८ रिश्टर स्केल
३ वाजून ४५ मिनिटांनी – २.६ रिश्टर स्केल
३ वाजून ५७ मिनिटांनी – ३.५ रिश्टर स्केल
५ वाजून ४ मिनिटांनी – २.२. रिश्टर स्केल
६ वाजता – ४.२ रिश्टर स्केल
७ वाजून ६ मिनिटांनी ४.२ रिश्टर स्केल

अशा तीव्रतेचे भूकंपाचे धक्के पालघर जिल्ह्याला बसले आहेत. माहितीनुसार या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा हानी झाली नाही आहे. पण सर्वत्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा – राज्यातील सर्व शाळा उघडण्याची तयारी सुरु