घरमहाराष्ट्रघरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार; मुख्य आरोपीस अटक

घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार; मुख्य आरोपीस अटक

Subscribe

घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुली धारावीत सापडल्या

कौटुंबिक वादातून घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुली अखेर धारावी परिसरात सापडल्या. पीडित दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी अपहरण, बलात्कारासह बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद होताच प्रकाश यशवंत सरवदे या २३ वर्षांच्या मुख्य आरोपीला सांताक्रूज पोलिसांनी अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांनी सांगितले. अटकेनंतर त्याला दिडोंशी विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील तक्रारदार दोन्ही महिला सांताक्रूज परिसरात राहतात. त्यापैकी एका महिलेला पंधरा तर दुसर्‍या महिलेला बारा वर्षांची मुलगी आहे. शनिवारी ४ जुलैला त्यांच्या घरी कौटुंबिक वाद झाला आणि या दोन्ही मुली घरातून निघून गेल्या, बराच वेळ होऊनही त्या परत घरी आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला, मात्र सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्या दोन्ही मुली सापडल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही महिलांनी सांताक्रूज पोलीस ठाण्यात त्यांच्या मुली हरवल्या असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद केली होती. या मुलींचा शोध सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांच्या पथकाला त्या दोघीही धारावी परिसरात सापडल्या. चौकशीत घरातून निघून गेल्यानंतर त्या दोघीही धारावी येथे आल्या होत्या.
तिथेच त्यांची ओळख प्रकाश सरवदेशी झाली. तो तिथल्याच एका देशी दारुच्या दुकानात कामाला होता. पाऊस जास्त असल्याने त्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या राहण्याची व्यवस्था करतो असे सांगून घरी आणले. त्यानंतर त्यांच्या मनाविरुद्ध त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पोलीस तपासात हा प्रकार उघडकीस येताच काही तासांत प्रकाश सरवदे याला पोलिसांनी अटक करुन दोन्ही मुलींची सुटका केली. या दोन्ही मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – CBSE चा विद्यार्थांना दिलासा; नववी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम केला कमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -