घरमहाराष्ट्रशहापूर एसटी डेपोला गळती

शहापूर एसटी डेपोला गळती

Subscribe

इमारतही धोकादायक ,गळक्या बसेसवरही डांबर

परिवहन महामंडळाच्या शहापूर एसटी डेपोतील भंगार झालेल्या बहुतांश नादुरुस्त असल्याचे समोर येत असतानाच परिवहन महामंडळाच्या नव्या अध्यायावत एसटी आगाराच्या इमारतीचे काम परिवहन बांधकाम विभागाकडून कासव गतीने सुरू आहे.

त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून आगाराच्या डेपो आणि इमारतीलाही गळती लागली आहे. त्यामुळे बस थांब्यावर पाण्याची डबकी झाली आहेत. तर छतही जीर्ण झाल्यामुळे प्रवाशांना धोका आहे. डेपोतील बहुतेक बसेसही गळक्या असल्याने बसच्या छतावर डांबर टाकून गळती रोखण्याचे प्रयत्न डेपो वर्कशॉपमध्ये केले जात आहे.

- Advertisement -

शहापूर परिवहन डेपोची इमारत 33 वर्षांपूर्वी बांधण्यात आली. या इमारतीचे बांधकाम जीर्ण झाले आहे. कालबाह्य झालेल्या इमारतीचे स्लॅब बांधकाम ढासळू लागले आहेत. डेपोच्या इमारतीच्या बांधकामाचा भार सांभाळणारे लोखंडी पोलही पूर्णपणे गंजून जीर्ण झाल्याने ते सडले आहेत. हे पोल निखळल्यास इमारतींचे बांधकाम कोसळून डेपोत एखादी मोठी दुर्घटना घडू शकते.

अशी भिती असताना आता तर पावसाळ्यात या डेपोच्या इमारतीच्या संपूर्ण छताला प्रचंड गळती लागली आहे. पावसाळ्यातील गळती सुरू झाल्याने डेपोत सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे डेपोतही प्रवाशांना छत्र्या उघडून बसावे लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -