घरमहाराष्ट्रराम मंदिराच्या मुद्यावरून शरद पवारांची सरकारवर टिका

राम मंदिराच्या मुद्यावरून शरद पवारांची सरकारवर टिका

Subscribe

राज्यात बळीराजा होरपळत आहे. त्याला मदतीची गरज आहे. पण, या साऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून शिवसेना आणि भाजपनं राम मंदिराचा मुद्दा पुढे केला आहे.अशी टिका शरद पवार यांनी केली आहे.

शिवसेनेनं केलेल्या अयोध्या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टिका केली आहे. राज्यात बळीराजा होरपळत आहे. त्याला मदतीची गरज आहे. पण, या साऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून शिवसेना आणि भाजपनं राम मंदिराचा मुद्दा पुढे केला आहे. तसेच रामाच्या मुर्तीची उंची किती असावी? यावर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चर्चा करायची आहे. मग जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष कोण देणार? असा सवाल देखील यावेळी शरद पवार यांनी केला आहे. पुण्यात पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संविधान स्तंभ लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी शरद पवार आणि बाबा आढाव प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण आणि सुभाष वारे देखील उपस्थित होते.

देशात अनेक भाषिक आणि विविध भागातील लोक राहतात. पण त्यानंतर देखील देश खंबीरपणे उभा आहे. कारण या सर्वांना संविधानानं बांधून ठेवलं आहे. भाजपाच्या एका नेत्याने संविधान दुरुस्तीची भाषा केली. यावरून केवळ मुठभर लोकांच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न असल्याची टिका देखील शरद पवार यांनी केली. पण, देशातील जनता तसं होऊ देणार नाही. यापूर्वी असा प्रयत्न करणाऱ्यांचं देशानं काय केलं हे सर्वांना ठावूक आहे. असा सुचक इशारा देखील शरद पवार यांनी यावेळी देत भाजपला लक्ष्य केलं.

- Advertisement -

वाचा – देशात भयानक स्थिती; लढण्यासाठी सज्ज व्हा – शरद पवार

तसेच बाबा आढाव यांनी देखील, शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सगळा इतिहास समाजापर्यंत पोहोचण्याची गरज यावेळी बाबा आढाव यांनी बोलून दाखवली. दरम्यान, देशात संविधानावर चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमिवर बालवयापासून संविधान शिकण्याची गरज आहे. त्यामुळे होणाऱ्या प्रत्येक सोहळ्याला संविधानाची प्रत द्यावी असं देखील यावेळी आढाव यांनी म्हटलं. शिवाय आपला देश हिंदु किंवा मुस्लिमांचा नसून भारतीयांचा असल्याची भावना बाबा आढाव यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच, पेट्रोल आणि डिझेल भरण्यास पंपावर गेल्यावर त्याचा भाव आठवतो का रामाची आठवण होते? अशा खोचक सवाल देखील यावेळी बाबा आढाव यांनी उपस्थित केला.

वाचा – यापुढे निवडणूक नाही – शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -