घरताज्या घडामोडीआता पोलिसांना बंदोबस्तावर बसायला मिळणार खुर्च्या!

आता पोलिसांना बंदोबस्तावर बसायला मिळणार खुर्च्या!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशाच्या राजकारणातील सर्वात वरिष्ठ नेते आहेत. ५० हून अधिक काळ संसदीय राजकारणात घालवलेल्या शरद पवारांना जे दिसतं, ते इतर राजकारण्यांना सहजासहजी दिसत नाही. शरद पवारांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवून एक मागणी केली आहे. या मागणीमुळे शरद पवार यांच्यातला संवेदनशील माणसाचे दर्शन राज्यातील सर्वच पोलिसांना झाले आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या सभा किंवा दौऱ्याप्रसंगी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्ताला लावलेला असतो. मात्र सभा-दौरा संपेपर्यंत हे पोलीस उभेच असतात. या पोलिसांना बसण्यासाठी व्यवस्था करुन देण्याची मागणी पवार यांनी केली आहे.

शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, “राज्यात मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौऱ्याप्रसंगी गर्दीचे नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त नेमला जातो. जाहीर सभा आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी पोलीस यंत्रणेवर ताण येत असतो. तसेच इतरवेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. कर्मचाऱ्यांसोबतच पोलीस अधिक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील तिष्ठत उभे असतात. बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी तत्पर आणि सज्ज असावयास हवे. मात्र सभा सुरळीत चालू असताना विशेषतः महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्राण सहन करावा लागतो, असे मला वाटते.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -