घरमहाराष्ट्र'विरोधकांना संताजी-धनाजीप्रमाणे कमळ दिसू लागलंय'

‘विरोधकांना संताजी-धनाजीप्रमाणे कमळ दिसू लागलंय’

Subscribe

शरद पवार यांनी इव्हीएम घोटाळ्यासंदर्भात चिंता व्यक्त केली असताना भाजपकडून आता त्यांना लक्ष्य केलं जात आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातल्या सर्व जागांसाठी मतदान संपलेलं असताना सर्व पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप, टोमणे मारायची जणू स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इव्हीएम मशिनमध्ये घोटाळ्याची शक्यता वर्तवली असतानाच आता भाजपकडून देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. ‘सर्वच विरोधकांना आता संताजी-धनाजीप्रमाणे कमळ दिसू लागलं आहे’, असा खोचक टोमणा राज्य सरकारमधील सहकारमंत्री सुभाष देसमुख यांनी केली आहे. शनिवारी ठाण्यात आयोजित केलेल्या सोलापूर महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना हा टोमणा मारला.

‘पराभवामुळेच शरद पवारांचा कांगावा!’

‘शरद पवार ज्या ठिकाणी मतदान करत होते त्या ठिकाणच्या मतदार यंत्रात बहुतेक कमळ निशाणीच नव्हती, असा माझा दावा आहे. पण सध्या उठसूठ विरोधकांना जिथे तिथे कमळच दिसत आहे’, असं सुभाष देशमुख यावेळी म्हणाले. ‘गेली ५० वर्ष शरद पवार राजकारणामध्ये आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण आता पराभव समोर दिसायला लागल्यामुळेच मतदान यंत्रांमध्ये बिघाड असल्याचा कांगावा ते करत आहेत. पूर्वी अनेकांना पाण्यात मराठ्यांच्या सेनेतले संताजी-धनाजी दिसायचे. तशीच परिस्थिती सध्या विरोधकांची झाली असून त्यांना सगळीकडे कमळच दिसत आहे’, असं देखील सुभाष देशमुख म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांचा ‘राजकीय खेळ चाले’!

१७ ते १९ मे या कालावधीत हायलँड पार्क, ढोकाळी या ठिकाणी सोलापर महोत्सव आयोजित केला जाणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी ते ठाण्यात आले होते. यावेळी सोलापूर सोशल फाऊंडेशनचे अभिजीत पाटील, इंद्रजित निंबाळकर, बाळासाहेब निंबाळकर, सीताराम राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘घड्याळाचं मत देखील कमळालाच’

काही दिवसांपूर्वी टीडीपी, आप, सीबीआयएम या पक्षांच्या प्रतिनिधिंसोबत मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यामध्ये पवारांनी इव्हीएममध्ये घोटाळा होण्याची भिती वाटत असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच दोनच दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये बोलताना ‘घड्याळाचं बटण दाबल्यानंतरही मत कमळाला गेल्याचं मी स्वत: पाहिलं’, असं सांगून शरद पवारांनी खळबळ उडवून दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -