घरमहाराष्ट्रपवारांचा संयम ढळला

पवारांचा संयम ढळला

Subscribe

पत्रकार परिषदेत पत्रकारावर संतापले,माफीची मागणी

नेहमी संयमाने व माध्यमांच्या तिरकस प्रश्नांवर तितक्याच मिश्किलपणे उत्तर देणारे शरद पवारांचा संयम ढळला. श्रीरामपूरमध्ये शुक्रवारी (दि.३०) पत्रकारांशी बोलताना एका पत्रकाराने शरद पवार यांना प्रश्न विचारला, की ‘तुमचे नातेवाईक पद्मसिंह पाटीलही पक्ष सोडत आहे’ या प्रश्नावर शरद पवार संतापले आणि त्यांनी थेट पत्रकार परिषदेतूनच निघून जाण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर पत्रकाराला माफीही मागण्यास लावली. अखेर ज्येष्ठ पत्रकारांनी मध्यस्थी करीत त्यांना शांत केले.

रयत शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘तुमचे नातेवाईक पद्मसिंह पाटीलही पक्ष सोडत आहेत’ एका पत्रकाराच्या या प्रश्नावर पवार संतप्त झाले. यावर राजकारणात नातेवाईकांचा काय संबंध, तुम्ही चुकीचे बोलत आहात, असे बोलणार असाल तर मला या पत्रकार परिषदेला कशाला बोलवायचे, माफी मागा, राजकारण आणि नातेवाईक यांचा काय संबंध? असा प्रतिप्रश्न शरद पवारांनी विचारला. त्यानंतर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित इतर पत्रकारांनी त्यांना बसवले आणि प्रश्न विचारणार्‍या पत्रकाराला शांत बसण्यास सांगितले.
यापूर्वी अनेक लोक पक्ष सोडून गेले. जेव्हा 60 आमदार निवडून आले होते. त्यावेळेस 52 आमदार बाहेर पडले. पुन्हा स्वबळावर सर्व जागा निवडून आणल्या. बाहेर पडल्याने कोणाचे नुकसान होत नाही. बाहेर पडलेल्यांचा विकास याच पक्षातून झाला. यापेक्षा कोणत्या स्वरूपाचा विकास होणार आहे.

- Advertisement -

नेते गेले पण कार्यकर्ते आमच्या बरोबर असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात 120-120 चा फॉर्म्यूला तयार केला आहे. राज्य सहकारी बँकेसंदर्भात बोलताना पवार म्हणाले, बँकेने कारखाने व उद्योग धंद्यांना कर्ज दिले होते. त्यांनी कर्ज फेडले नाही, म्हणून जप्तीची कारवाई करण्यात आली. लिलावातून मिळालेले पैसे बँकेत जमा आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -