घरCORONA UPDATEनागरिकांनी सुचनेचे तंतोतंत पालन करावे - शरद पवार

नागरिकांनी सुचनेचे तंतोतंत पालन करावे – शरद पवार

Subscribe

करोना व्हायरसचा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवरून लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

  • करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यात झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवरून लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील जनतेसमोर उभ्या ठाकलेल्या महाभयानक आपत्कालीन परिस्थिती वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा व सुव्यवस्था, कामगारांच्या समस्या अशा अनेक आव्हानाबाबत शरद पवार यांनी प्रकाश टाकला.

यावेळी शरद पवार म्हणाले की, नागरिकांना केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच सहकार्य करावे. घरात थांबा आणि स्वच्छ राहा. आणि अधिक लोक जमू नाका तसेच दोन व्यक्तीमध्ये अंतर ठेवा. रिझर्व्ह बँकेने नवे निर्णय जाहीर केले आहे, याचे स्वागत आहे. रोग वाढतोय हे खरे आहे यावर घाबरून जाण्याचे कारण नाही. सरकारने यावर प्रभावी पाऊल उचलली पाहिजे. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळविण्याचे मार्ग थांबवू नका. कापूस पीक महत्त्वाचे आहे. परंतु करोनामुळे कापूस पीक संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -