घरताज्या घडामोडी'शरद पवार जाणते राजे, तर अजित पवार आमची स्टेपनी'

‘शरद पवार जाणते राजे, तर अजित पवार आमची स्टेपनी’

Subscribe

भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्यानंतर मोठा वाद उद्भवला होता. त्यानंतर भाजपकडूनही पलटवार करण्यात आला. मोदींची तुलना चालत नसेल तर शरद पवारांना ‘जाणता राजा’ कसे संबोधतता? असा प्रश्न भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मात्र शरद पवार हे ‘जाणते राजे’च असल्याचे म्हटले आहे. लोकमत वृत्तपत्रातर्फे घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले आहे. तसेच अजित पवार हे महाविकास आघाडीच्या सरकारमधील स्टेपनी असल्याचेही कोपरखळी त्यांनी यावेळी मारली.

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वशंजावर देखील टीका केली होती. त्यानंतर छत्रपतींच्या वशंजांनी देखील राऊत यांच्यावर टीका केली. “शिवाजी महाराजांवर कुणीही हक्क सांगण्याचा प्रयत्न करु नये. छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वाचे दैवत आहेत.” असा पलटवार आज राऊत यांनी पुन्हा केला आहे. “आम्ही सातारा, कोल्हापूर येथील छत्रपतींच्या गाद्यांचा आदर करतो. छत्रपतींचे नाव जिथे जिथे येईल, तिथे आम्ही नतमस्तकच होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे रक्षणकर्ते होते, ते लुटमार करणारे नव्हते”, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

शरद पवारांच्या बाबतीत बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार हे जाणते राजे आहेतच. महाराष्ट्राच्या जनतेने ती उपाधी दिली आहे. तसेच बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट ही उपाधी देखील लोकांनीच दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचे राजे ही उपाधी देखील लोकांनीच दिली होती. लोकांसाठी निर्णय घेणारा, काम करणारा नेता आपोआपच जाणता राजा होतो, असे ते म्हणाले.

अजित पवार ‘स्टेपनी’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करुन शपथ घेतली होती. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, “भाजपने आमच्या महाविका आघाडीच्या गाडीचा नटबोल्ट ढिला करण्याचा प्रयत्न केला. तरिही आमची गाडी सुरळीत होती. मात्र अजित पवार यांच्या रुपाने त्यांनी आमच्या गाडीची स्टेपनी पळवली होती. मात्र शरद पवारांनी दोन दिवसांत ती पुन्हा आणून गाडीला जोडली.”

- Advertisement -

अजित पवार हे तुमच्यासाठी स्टेपनी आहेत का? असा प्रश्न विचारल्यानतंर मात्र राऊत चांगलेच गोंधळले. त्यानंतर त्यांनी सावरून घेत, स्टेपनी हा गाडीतील महत्त्वाचा प्रकार असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -