घरमहाराष्ट्रनिलेश राणेंच्या खासदारकीसाठी पवार - राणे गुफ्तगु?

निलेश राणेंच्या खासदारकीसाठी पवार – राणे गुफ्तगु?

Subscribe

शरद पवार आणि नारायण राणे यांच्यामध्ये चर्चा चर्चा तर झाली. पण निलेश राणेंना खासदारकी मिळेला का ही शंकाच आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कणकवलीमध्ये भेट झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं. नारायण राणे भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा देखील जोरात रंगल्या. शिवाय नारायण राणे आणि शरद पवारांच्या भेटीचं कारण काय? यावर अनेकांनी तर्कवितर्क लढवले. पण माय महानगरला मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे – शरद पवारांची भेट ही निलेश राणेंच्या खासदारकीसाठी होती अशी माहिती हाती लागली आहे. भाजप – शिवसेनेची लोकसभेसाठी युती होणार असल्यानं रत्नागिरी – सिंधुदुर्गमधून निलेश राणेंना उमेदवारी मिळणारी हे नक्की! त्यामुळे नारायण राणे यांनी आता पुत्र निलेश राणे यांच्या राजकीय भवितव्यासाठी फिल्डींग लावल्याची माहिती माय महानगरला मिळाली आहे. कारण शिवसेना – भाजप युती झाल्यास रत्नागिरी – सिंधुदुर्ग विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी मिळणार. त्यामुळे मग निलेश राणे यांच्या खासदारकीचं काय? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शरद पवार आणि नारायण राणे यांनी निलेश राणे यांच्या उमेदवारीवर चर्चा केल्याचं समजतंय.

निलेश राणेंच्या टिकेला शरद पवार विसरणार?

राजकारणात कुणी कुणाचा कायमचं शत्रु आणि मित्र नसतं हे सुत्र. पण शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्यावर देखील माजी खासदार आणि नारायण राणे यांचं ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांनी ट्विटरवरून टिका केलेली आहे. शिवाय, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांनी देखील थेट लक्ष्य केलेलं आहे. त्यामुळे या टिकेला विसरून शरद पवार निलेश राणे यांनी लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी सहमती देणार का? हे पाहावं लागणार आहे.

- Advertisement -

- Advertisement -

वाचा – राणेंच्या घरी पोहचले पवार; चर्चांना उधाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -