घरमहाराष्ट्रपार्थची जागा न येणारीच होती - शरद पवार

पार्थची जागा न येणारीच होती – शरद पवार

Subscribe

शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांच्या पराभवावर देखील पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मावळ मतदारसंघ जिंकून येणारच नव्हता, असे पवार म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. तर मावळ मतदारसंघात शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांचा पराभव झाला आहे. या पराभवावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, तो मतदारसंघ जिकूंन येणारच नव्हता. याउलट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिथे चांगली मेहनत केली, असे शरद पवार म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले की, ‘मी निवडणूक लढणार होतोच. २०१४ लाच मी निवडणूक लढलो नव्हतो. त्यामुळे २०१९ साली देखील निवडणूक लढणार नाही, असा मी निर्णय घेतला होता. पक्षामध्ये काही मताधिक्य होते. त्यामुळे त्यांच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढवेल असे म्हटले होते. मी निवडणूक सोडली, असे म्हणण्यात काही तथ्य नाही. पार्थची जी जागा होती, ती जागा आम्हाला न येणारी जागा होती. त्यामुळे न येणाऱ्या जाग्यावर निवडणूक लढवून बघावी, असा निर्णय आम्ही घेतला होता. गेल्या मावळमध्ये आम्ही जिंकलो नव्हतो. तिथे आमच्या कार्यकर्त्यांनी बराच प्रयत्न केला होता.’

- Advertisement -

मनसेचे उमेदवार असते तर चित्र वेगळ असतं – शरद पवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात राज्यभरात प्रचारसभा घेऊन भाजप सरकारला धारेवर धरले होते. परंतु, या सभांचा भाजपवर फार काही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळालेला नाही. दरम्यान मनसे विषय प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, ‘मनसेचा उमेदवार असता तर राज्यात वेगळी परिस्थिती असती. याशिवाय भाजपला इतक्या जागांवर यश मिळेल, ते अनपेक्षित होते.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -