घरमहाराष्ट्रराणेंच्या घरी पोहचले पवार; चर्चांना उधाण

राणेंच्या घरी पोहचले पवार; चर्चांना उधाण

Subscribe

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कणकवलीत दाखल झाले आहेत. काही तासांपूर्वीच शरद पवार राणे यांच्या घरी पोहचले आहेत. सध्यातरी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही ‘राणे-पवार’ भेट चर्चेचा विषय ठरते आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना पवार यांनी राणे यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विवध चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवार सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. एकीकडे निलेश राणे लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदूर्गाच्या तिकिटासाठी उत्सुक आहेत. मात्र, दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे ताकदवर उमेदवार असल्याचा दावा काँग्रेससोबत झालेल्या जागावाटपाच्या बैठकीत राष्ट्रवादीनं केला होता. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर आता नारायण राणे यांची शरद पवारांनी घेतलेली भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे? हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -