घरताज्या घडामोडीसहामाहीत मुख्यमंत्र्यांसह सर्व विदयार्थी पास - शरद पवार

सहामाहीत मुख्यमंत्र्यांसह सर्व विदयार्थी पास – शरद पवार

Subscribe

'सहा महिन्यांत आमचा विद्यार्थी परीक्षेत संपूर्ण पास झाला आहे. तो पुढची परीक्षा, पुढचे पेपरही सहजपणाने सोडवेल', अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

राज्याचा कारभार हाकण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका विरोधकांकडून होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘सहा महिन्यांत आमचा विद्यार्थी परीक्षेत संपूर्ण पास झाला आहे. तो पुढची परीक्षा, पुढचे पेपरही सहजपणाने सोडवेल’, अशी खात्री असल्याचे म्हणालेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली त्यावेळी संजय राऊत यांनी सहा महिने हा परीक्षेचा काळ असतो. जसे पूर्वी वार्षिक परीक्षा, सहामाही परीक्षा असायच्या मग ते प्रगती पुस्तक येते पालकांकडे. तसे या सरकारचं सहा महिन्यांचे प्रगती पुस्तक आपल्याकडे आलंय का? असा सवाल राऊतांनी पवारांना विचारला. त्यावेळी पवारांनी सहामाहीत विद्यार्थी पास झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान आता ही सहा महिन्यांची परीक्षा झाली. परीक्षा संपूर्ण झाली असे मला वाटत नाही. परीक्षेतला प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे’.

काय म्हणाले शरद पवार?

‘तोच तर महत्त्वाचा आहे. आता कोठे लेखी परीक्षा झाली आहे, पण त्या परफॉर्मन्सवरून तरी प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा हे सरकार यशस्वी होईल’, असा आता ट्रेंड दिसतोय. दुसरे महत्त्वाचं म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच निष्कर्ष काढणं योग्य नाही. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसतोय. त्यामुळे निकालाची चिंता बाळगावी अशी स्थिती दिसत नाही’, असे देखील पवार यावेळी म्हणालेत. दरम्यान यावेळी आपण हे मुख्यमंत्र्यांविषयी सांगत आहात’, असा प्रश्न राऊत यांनी मध्येच विचारला. त्यावर पवार म्हणाले, मुख्यमंत्री, शेवटी राज्यप्रमुख हा महत्त्वाचा असतो. त्याच्या खालची टीम काम करते,’ असे शरद पवार म्हणालेत.

- Advertisement -

हेही वाचा – राजभवनात कोरोनाचा शिरकाव; १६ जणांना कोरोनाची लागण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -