घरताज्या घडामोडी..तर भाजपचा आकडा ४०-५० असता - शरद पवार

..तर भाजपचा आकडा ४०-५० असता – शरद पवार

Subscribe

बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची पद्धत यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे.

राज्यात १०५ जागा जिकुंनही सत्ता स्थापन न करता आल्याने भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. यांनी भाजपचे १०५ आमदार जिंकण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसेनासोबत नसती तर १०५ चा आकडा ४०-५० असता अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपवर शेलक्या शब्दात टीका केली. बाळासाहेबांचा विचार, कामाची पद्धत भाजपशी सुसंगत नव्हती. बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची पद्धत यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजनांचा सन्मान केला. बाळासाहेबांची भाजपसोबतची युती व्यक्तिसापेक्ष होती”, असंही शरद पवारांनी सांगितले.

शिवसेनेला गृहीत धरण्याची भाजपची भूमिका –

ज्यांनी १०५ वर पोहचवण्याचे काम केले त्यांनाच जर गृहित धरण्याची भूमिका भाजप घेतली दरम्यान जे भाजपला जमले नाही ते शरद पवार यांनी करून दाखवले असे संजय राऊत यांनी विचारले असता पवार म्हणालेत असं म्हणणं हे पूर्ण खरे नाही. मला जे बाळासाहेब ठाकरे माहीत आहेत, माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना कदाचित अधिक माहिती आहेत, पण बाळासाहेबांची संबंध विचारधारा,  कामाची पद्धत ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी सुसंगत होती असे मला कधी वाटलंच नाही, असंही पवार म्हणाले. बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची पद्धत यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजनांचा सन्मान केला. बाळासाहेबांची भाजपसोबतची युती व्यक्तिसापेक्ष असल्याचे देखील पवार यावेळी म्हणालेत.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘मी पुन्हा येईन’ हा चेष्टेचा विषय, शरद पवार यांचा फडणवीसांना टोला


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -