घरमहाराष्ट्रशरद पवार, नितीन गडकरी करणार राणेंच्या पुस्तकाचे प्रकाशन

शरद पवार, नितीन गडकरी करणार राणेंच्या पुस्तकाचे प्रकाशन

Subscribe

नारायण राणेंच्या 'नो होल्ड्स बार्ड’ या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्या पुस्तक प्रकाशनाला वेळ देत नसल्याने आता नारायण राणेंच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन खासदार शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते शुक्रवारी होणार आहे. नो होल्ड्स बार्ड’ (No Holds Barred’) या आत्मचरित्राच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन शरद पवार यांच्याहस्ते तर इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार आहे. १६ ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न होईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नारायण राणे यांच्या आत्मचरित्राला शरद पवार यांची प्रस्तावना देण्यात आली आहे.

narayan rane book inaugration
नारायण राणे यांच्या पुस्तक प्रकाशनाची कार्यक्रम पत्रिका

म्हणून मुख्यमंत्री वेळ देईनात!

नारायण राणे यांनी लिहिलेल्या या आत्मचरित्रामध्ये राणेंनी शिवसेनेबाबत अनेक गौप्यस्फोट केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणेंना वेळ देत नसून, मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाराजी ओढवून घ्यायची नसून, नुकतीच युतीमधील भांडणे मिटून शिवसेनाभाजपा लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये देखील युती झाली आहे. त्यामुळे या युतीमध्ये कोणताच दुरावा पुन्हा येऊ नये, याची मुख्यमंत्री काळजी घेत असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नारायण राणे यांना हे आत्मचरित्र निवडणुकीआधी प्रकाशित करायचे असून, यासाठीच राणेंचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला मुख्यमंत्री वेळ देईनात!

काय आहे आत्मचरित्रामध्ये

दरम्यान, राणेंच्या आत्मचरित्रांतील काही पाने माध्यमांच्या हाती लागली होती. या आत्मचरित्रामध्ये जर नारायण राणे पक्षात राहिले तर मी आणि रश्मी ठाकरे घर सोडून जाऊ अशी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना धमकी दिल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. तसचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या मनात माझ्याबद्दल राग होता, कारण त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून मला त्या पदावर नेमण्यात आले होतं. त्यामुळे त्यांनी माझ्याविरोधात उद्धव ठाकरेंचे कान भरले, असा दावा देखील या आत्मचरित्रामध्ये करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -