गोंदियाच्या शिक्षक साहित्य संमेलनात शरद पवार येणार

गोंदिया येथे होणाऱ्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनात ज्येष्ठ नेते शरद पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra
sharad pawar
शिक्षक साहित्य संमेलनाला शरद पवार

गोंदिया येथे होणाऱ्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनात ज्येष्ठ नेते शरद पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक आणि नाटककार प्रा. वामन केंद्रे यांची निवड झाली असून खासदार प्रफुल्ल पटेल संमेलनाचे उदघाटन करणार आहेत. २३ डिसेंबर २०१८ रोजी नटवरलाल माणिकलाल दलाल आर्टस् व कॉर्मर्स महाविद्यालय, गोंदिया येथे हे साहित्य संमेलन होत आहे.

साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर 

शिक्षक साहित्य संमेलनाचे संस्थापक आमदार कपिल पाटील, माजी खासदार नाना पटोले, कवयित्री प्रभा गणोरकर, संमेलन संस्थेच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांच्यासह राज्यभरातून मराठी साहित्यावर प्रेम करणारे शिक्षक, मान्यवर हजेरी लावणार आहेत, अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांनी दिली आहे.

वाचा : शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. वामन केंद्रे

आमदार पाटील यांच्या संकल्पनेतून संमेलन सुरु

आठ वर्षांपूर्वी शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर भाषा आणि साहित्याचे अध्यापन आशय समृद्धीसाठी आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून हे संमेलन सुरु झाले. यापूर्वीची सात संमेलनं मुंबई, ठाणे, बुलडाणा, रत्नागिरी येथे मोठ्या दिमाखात पार पडली आहेत.

साहित्यिकांची मांदियाळी 

आजपर्यंत कवयित्री नीरजा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नाटककार शफाअत खान, कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, लोकशाहीर संभाजी भगत, ख्यातनाम लेखक प्रविण बांदेकर, कवी जयवंत पाटील यांनी यापूर्वीच्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, हिंदूकार डॉ. भालचंद्र नेमाडे, ख्यातनाम विचारवंत प्रा. पुष्पा भावे, ज्येष्ठ नाट्यकर्मी सुलभा देशपांडे, नितीन वैद्य, कवी वसंत आबाजी डहाके, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, कादंबरीकार रंगनाथ पठारे, गीतकार जावेद अख्तर, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे यापूर्वीच्या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

वाचा : महिला आरक्षणासाठी राजकीय पक्षांनी एकत्र यावं – पवार

ग्रंथदिंडी, टॉक शोचे आयोजन

गोंदीया येथे होणाऱ्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशी २२ डिसेंबर रोजी ग्रंथदिंडी, टॉक शो, झाडीपट्टीतील नाटके आणि मुख्य सोहळा २३ डिसेंबर रोजी उदघाटन सोहळा, निमंत्रित कवींचे संमेलन असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here