नातवासाठी आजोबांची माघार, पवार माढ्यातून लढणार नाहीत!

Pune
NCP Chief Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यासाठी पक्षातून दबाव वाढत आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातून किती लोकांनी निवडणुक लढवावी? असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे नैतिक जबाबदारी घेत शरद पवार यांनी स्वतः लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या निर्णयाबद्दल पक्ष आणि कुटुंबाशी चर्चा केली असल्याचेही शरद पवार म्हणाले. आज पुणे येथे बारामती हॉस्टेल येथे पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी पक्षातून आग्रह होत आहे. शेकापनेही मावळसाठी पार्थ पवार यांना पाठिंबा दिला आहे. तसेच एका कुटुंबातील किती लोकांना उमेदवारी द्यायची याची चर्चा कुटुंबात केली असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच मी आतापर्यंत १४ वेळा निवडणुका लढल्या आणि जिंकल्या आहेत. त्यामुळे निवडणूक न लढण्यामागे पराभवाची चिंता नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले. एकाच कुटुंबातील तिघांनी निवडणूक लढवणे योग्य नसल्याचे पवार म्हणाले.

हे वाचा – पार्थ पवार यांच्यासाठी शरद पवारांवर वाढता दबाव

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here