घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटपवारांची माढातून माघार; रामदास आठवले म्हणतात

पवारांची माढातून माघार; रामदास आठवले म्हणतात

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे सत्ताधारी पक्षांनी आनंद व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीय यांनी हा युतीचा विजय असल्याचे म्हटले आहे. मात्र रामदास आठवले यांनी वेगळे मत मांडले आहे. यावेळी पंतप्रधान पदासाठी आपला नंबर लागेल, असे पवारांना वाटले होते. म्हणून ते लोकसभा लढवत होते. मात्र युतीचे सरकार येणार असल्यानेच पवार यांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न भंगले आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, अशी कोपरखळी रामदास आठवले यांनी पवारांना मारली आहे.

हे वाचा – नातवासाठी आजोबांची माघार, पवार माढ्यातून लढणार नाहीत!

कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना आठवले यांनी पवारांच्या भूमिकेवर वक्तव्य केले. शरद पवार निवडणुक लढवणार नाहीत, या निर्णयाचे मी स्वागत करतो. यावेळी युतीचे सरकार पुन्हा येणार असून शरद पवार यांना पंतप्रधान होता येणार नाही, हे त्यांना कळले असल्यामुळेच त्यांनी माघार घेतली, असे आठवले म्हणाले.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर म्हणतात आमच्यामुळेच माघार

रामदास आठवले यांनी पवार यांच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक आणि भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वेगळेच मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन शरद पवार यांनी माढातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांनी नातवासाठी माघार घेत असल्याचे सांगितले. मात्र या वयात शरद पवार यांनी माघार घेणे योग्य नाही. कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर त्यांनी निवडणूक लढवली पाहीजे, अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली आहे.

शरद पवारांनी राष्ट्रवादी कोंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन, त्यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे.

Posted by Balasaheb Ambedkar on Monday, March 11, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -