घरअर्थजगतCORONA VIRUS: अख्खा शेअर बाजार गडगडला

CORONA VIRUS: अख्खा शेअर बाजार गडगडला

Subscribe

शेअर बाजारातील निर्देशांकात आता १८३७ अंशांची घसरण झाली आहे.

कोरोना विषाणूचा परिणाम आता आर्थिक विकासावर दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून शेअर बाजार गटांगळी खात आहे. दरम्यान, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुढील महिनाभरासाठी युरोपमधून अमेरिकेत येण्यास प्रवास बंदी केली आहे. तसेच WHO ने जागतिक महामारी घोषीत केली आहे. त्यामुळे याचा चांगलाच फटका शेअर बाजाराला बसला आहे.


हेही वाचा – करोना व्हायरस : पर्यटकांना १५ एप्रिलपर्यंत भारतात येण्यास बंदी

- Advertisement -

गुरुवारी सकाळच्या सत्रातील पहिल्या मिनीटातच सहा लाख कोटींचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारातील निर्देशांकात आता १८३७ अंशांची घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये देखील ५०० अंकांची घसरण झाली आहे. दरम्यान, अमेरिकेचा ४ टक्क्यांनी शेअर बाजार घसरला आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मार्च २०१८ नंतर पहिल्यांदाच निफ्टी १० हजाराच्या खाली आला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -