घरमहाराष्ट्रनाशिकमजूर, बेघर, भिक्षेकर्‍यांसाठी १८ शाळांमध्ये निवारा केंद्र

मजूर, बेघर, भिक्षेकर्‍यांसाठी १८ शाळांमध्ये निवारा केंद्र

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील सहाही विभागात प्रत्येकी तीन अशा १८ शाळांमध्ये मजूर, बेघर आणि भिक्षेकर्‍यांसाठी निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील सहाही विभागात प्रत्येकी तीन अशा १८ शाळांमध्ये मजूर, बेघर आणि भिक्षेकर्‍यांसाठी निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे.

नाशिक पूर्व, पश्चिम, पंचवटी, सातपूर, नवीन नाशिक व नाशिक रोड या ६ विभागात शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  त्या ठिकाणी संबंधित नोडल ऑफिसर तथा केंद्र समन्वयक मनपा शिक्षण विभाग नाशिक यांच्या नियंत्रणाखाली कार्यवाही करण्यात आलेली आहे. शिक्षण विभागातील शिक्षक कर्मचारी यांची  संपर्क मदत कक्षात नेमणूक करण्यात आली असून त्या निवारा केंद्रात प्रथम सत्र, द्वितीय सत्र व तृतीय सत्र असे करण्यात आले आहे. पहिल्या सत्रातील कामकाजाची वेळ सकाळी ६ ते दुपारी २,  दुसर्‍या सत्रातील कामकाजाची वेळ दुपारी २ ते रात्री १० तर तिसर्‍या सत्रातील कामकाजाची वेळ रात्री १० ते सकाळी ६ अशी राहणार आहे.

- Advertisement -

येथे साधा संपर्क :

मदत कक्षाच्या संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ०२५३-२५७१२८९ व ०२५३- २२२२४४७. कुणाला मदत हवी असल्यास या क्रमांकावर संपर्क करून याबाबतची माहिती विभागास मिळाल्यास मोलमजुरी करणारे, कामगार बेघर यांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था पालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने निश्चित केलेल्या १८ शाळांतील निवारा केंद्रात करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने कळवले आहे.

पालिकेच्या नियंत्रण कक्षांचा संपर्क :

नाशिक महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्याचाच  एक भाग म्हणून पालिकेच्यावतीने नियंत्रण कक्ष तयार केलेले आहे. नागरिकांना या क्रमांकावर संपर्क साधावा

- Advertisement -
  • आपत्ती व्यवस्थापन कक्ष ०२५३-२५७१८७२(२४ तास)
  • माहिती कक्ष ०२५३-२३१७२९२(पालिका मुख्यालय सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत)
  • उपचार केंद्र ०२५३-२५९००४९ डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटल,कथडा(२४ तास)

 

 

मजूर, बेघर, भिक्षेकर्‍यांसाठी १८ शाळांमध्ये निवारा केंद्र
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -