कांटे की टक्कर

Subscribe

शिरूर लोकसभा निवडणूक अत्यंत रंगतदार परिस्थिती येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार डॉ.अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील हे प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या १५ वर्षांपासून त्यांना राजकारणातील प्रदीर्घ अनुभव असून डॉ.अमोल कोल्हे यांची राजकारणात पाटी कोरी आहे. सध्याचे राजकीय वातावरण पाहता प्रचारात अमोल कोल्हे हे अग्रेसर दिसत असून त्यांना जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्षाचे डॉ.अमोल कोल्हे हे स्वराज्य रक्षक संभाजी आणि काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेली मालिका छत्रपती शिवाजी महाराज यामुळे आणि नाटक, चित्रपट याद्वारे ते घरोघरी पोहचले आहेत. तर शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना राजकारणातील अनुभव असून त्यांना मतदारसंघातील जाण आहे. याबाबतीत अमोल कोल्हे यांची पाटी कोरी आहे. परंतु, प्रचारात अमोल कोल्हे हे उजवे ठरत आहेत. शिवसेनेकडे अमोल कोल्हे यांच्या बाबतीत बोलण्यासाठी ठोस असे कारण नाही. अमोल कोल्हे यांनी या अगोदर शिवसेनेचे संपर्क प्रमुख पद भूषविलेले असून त्यांचा आढळराव यांच्यासोबत शीतयुद्ध सुरूच होते. शिवसेनेत अंतर्गत छुप्या पद्धतीने धुसफूस आहे. त्यामुळे याचा फायदा अमोल कोल्हे यांना होणार का हे पाहावे लागणार आहे.

- Advertisement -

शिरूर लोकसभा मतदार संघात गेल्या १५ वर्षांपूर्वीचे जुनेच प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत.हेच निवडणुकीचे मुख्य कारण आहे. मतदार संघात खेड, मंचर, चाकण, नारायणगाव, मोशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. मात्र याचा प्रश्न अद्यापही शिवसेनेच्या विद्यमान खासदारांनी सोडवल्याचे दिसत नाही. तसेच पुणे नाशिक रस्त्याचे रुंदीकरण, पुणे नाशिक रेल्वे झालेली नाही. या सर्व प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त आहेत. तर भोसरीमधून आमदार महेश लांडगे याच्या समर्थकांनी आढळराव यांच्या विरोधात बैठक घेतली होती. त्यानंतर मात्र आमदार लांडगे आणि आढळराव यांचे मनोमिलन झाले असेल तरी अंतर्गत फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढील आठवड्यात शिरूर लोकसभेचे मतदान होणार आहे. उमेदवार अमोल कोल्हे आणि विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील हे प्रत्येक गावात पोहचवून कोपरा सभा आणि बैठकांचा जोर सुरू आहे. प्रत्येक गाव पिंजून काढले जात असून स्वतः ला सिद्ध करण्याचा प्रयत्न प्रचारातून होत आहेत. येणार्‍या २९ एप्रिल रोजी दोघांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव यांच्यात काटे की टक्कर असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -