घरताज्या घडामोडीशिवभोजन थाळी, दररोज १ लाख लोकांच्या मुखात

शिवभोजन थाळी, दररोज १ लाख लोकांच्या मुखात

Subscribe

शिवभोजन थाळीसाठी आता १५० कोटी रूपयांची अतिरिक्त अशी निधीची तरतुद

शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढवत आज शिवभोजन थाळाची राज्यातील व्याप्ती वाढवण्यात आली आहे. त्यासाठी विशेष आर्थिक तरतुदही आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने करण्यात आली आहे. आता दररोज १ लाख लोकांसाठी ही थाळी उपलब्ध होईल असे आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आले. शिवभोजन थाळीसाठी आता १५० कोटी रूपयांची अतिरिक्त अशी निधीची तरतुद करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले. याआधी फक्त १८ हजार जणांसाठीच या शिवभोजन थाळीची व्याप्ती होती. नागरिकांना सकस आणि चांगले जेवण मिळावे या उद्देशाने राज्यात शिव भोजन थाळीची सुरूवात करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानापासून सुरु झालेल्या या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या दहा रुपयांमध्ये ‘शिवभोजन योजने’ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान २६ जानेवारीपासून सुरू केलेल्या या शिवभोजन थाळीकडे मुख्यमंत्र्यांनी बारकाईने लक्ष दिले असून, शिवभोजन योजनेत जेवण देताना स्वच्छता, टापटीप आणि जेवणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वत:या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहे. शिवभोजन थाळीला आता सिद्धीविनायक मंदिर न्यासाने मदत दिली असून, या योजनेसाठी ५ कोटींची मदत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसा प्रस्ताव मंदिर न्यास विश्वस्त मंडळाने मंजूर करून तो राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला आहे. शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिल्या होत्या, त्यानुसार आता या योजनेतील थाळीच्या इष्टाकांत दुप्पट वाढ करण्यात आली असून ही संख्या १८ हजारांवरुन ३६ हजार थाळी इतकी झाली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -