घरताज्या घडामोडीऔरंगाबाद : शिवजयंतीला गालबोट; मिरवणूकीत घुसून तरुणाचा खून

औरंगाबाद : शिवजयंतीला गालबोट; मिरवणूकीत घुसून तरुणाचा खून

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मिरवणूकीत एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र आणि देशभरात उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. मात्र देशाच्या राजधानीत शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. झाले असे की, शिवजयंती निमित्त औरंगाबादमध्ये शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत घुसून एका तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. श्रीकांत गोपीचंद शिंदे (२०), असे या तरुणाचे नाव असून हा तरुण गारखेडा याठिकाणी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी श्रीकांतचा भाऊ सूरज शिंदे यांच्या फिर्यादीवरुन पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत गोपीचंद शिंदेंचे सध्या बी. ए. चे शिक्षण सुरु होते. बुधवारी, १९ फेब्रुवारी रोजी मित्रांसोबत तो मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. हनुमाननगरकडून पुंडलिकनगरछत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या मिरवणूकीत तो सहभागी होता. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, श्रीकांतचे काही अनोळखी तरुणांसोबत जोरदार भांडण झाले होते. भांडणानंतर श्रीकांत मिरवणूकीत सहभागी झाला होता. डीजेच्या तालावर इतर तरूणांसोबत श्रीकांतने ताल धरला. त्याचवेळी अचानक आरोपीने श्रीकांतच्या छातीत चाकू खुपसला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे श्रीकांत जमीनीवर कोसळला. त्यानंतर आरोपींनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला असून याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच आरोपींना पकडण्यासाठी चार पथके नेमण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवजयंतीला गालबोट, हडसर किल्ल्यावर ट्रेकर तरुणीचा दुर्दैवी मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -