घरमहाराष्ट्रबाळासाहेबांमुळे सेना-भाजपचे मनोमिलन

बाळासाहेबांमुळे सेना-भाजपचे मनोमिलन

Subscribe

सध्या लोकसभा निवडकीचे वारे देशभर वारे वाहत आहेत. त्या पाश्वभुमीवर राज्यात दोन्ही कॅांग्रेसची आघाडी झाली आहे, बहुजन वंचीत आघाडीही आकार घेत आहे.आशा वातावरणात शिवसेना -भाजप यांच्यात युतीचे अद्याप संकेत मिळत नाहीत. उलटपक्षी दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत. काही वर्षापुर्वी मित्रपक्ष असलेल्या या दोन पक्षांमधील संबंध इतके ताणले गेले आहेत की, दोन्ही बाजुनी स्वबळाच्या गोष्टी सुरु झाल्या आहेत.आशा स्थितीत युतीचे शिल्पकार म्हणुन ज्याना संबोण्यात येते, तेच शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा सेना-भाजपच्या युतीचे शिल्पकार ठरले आहेत. कारण येत्या दोन दिवसांत लोकसभेसाठी जागावाटपावर सुरुवात होणार असल्याची माहिती सुत्रांकडुन मिळाली.

शिवसेनाप्रमुखांच्या ९३ व्या जयंतीनिमीत्त फडणवीस सरकारणे त्यांच्या स्मारकासाठी १०० कोटींची निधी मंजूर केला, तसेच जुन्या महापौर बंगल्यात येऊन स्मारकाचे गणेश पूजनही केले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी सुमधूर चर्चाही केली. त्यामुळे युतीच्या चर्चेला सकारात्मक सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे, स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजीत बुधवारी मोठ्या उत्साहात गणेश पुजणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे,रश्मी ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे,भाजप नेत्या पुनम महाजन, केंद्रीय मंत्री अनंत गीते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना नेत्या निलम गोर्हे आदी उपस्थीत होते. यावेळी महापौर बंगळ्याच्या हस्तांतरणाची अधिक्रुत कागदपत्रे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीकडे सुपूर्द करण्यात आली.

- Advertisement -

आजच्या कार्यक्रमात मुख्य़मंत्री फडणवीस अगदी सहजगत्या मिसळुन गेले.त्यानी उध्दव ठाकरे यांच्याशी बंद दाराआड काही काळ चर्चाही केली. मागील काही दिवसांपुर्वी उध्दव ठाकरे यानी “चौकीदार ही चोर है’ असे म्हणत थेट कॅांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिळवला होता.त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. त्यावेळी आपण योग्य उत्तर देऊ,अशा इशारा मुख्यमंत्र्यानी दिला होता. यावरुन युतीमध्ये कमालीचा तणाव वाधल्याचे पाहायला मिळाले होते.मात्र बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी ज्या काही घडामोडी घडल्या त्यावरुन सेना-भाजपच्या युतीचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा आता शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्याना वाटू लागली आहे.

असाही एक शिवसैनिक

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातील एक शिवसैनीक म्हणजे गिरीश पाटील. गिरीश पाटील हे दिव्यांग आहेत. २५ वर्षापूर्वी बाळासाहेबानी आपल्या वाढदिवशी गिरीश पाटील यांना सायकल भेट दिली होती. तेव्हापासुन आतापर्यंत पाटील शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात. बाळासाहेबांच्या वाढदिवशी ते न चुकता हजेर राहायचे. बुधवारीही ते शिवसेना भवन येथे ऊपस्थीत होते. बाळासाहेब हिंदुजा ह्रॅास्पीटलमध्ये होते तेंव्हा त्यांची सेवा केली…

- Advertisement -

बाळासाहेबांचा जयघोष…

शिवसेनाप्रमुखांच्या ९३ व्या जयंतीनिमीत्त शिवसेनेच्यावतीने राज्याच्या कानाकोपर्यात कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.मात्र दरवर्षीप्रमाणे मुंबईच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्म्रुतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक जमल्याचे पाहायला मिळाले… यावेळी जमलेल्या शिवसैनिकानी ‘बाळासाहेब जिंदाबाद…. बाळासाहेब ठाकरे अमर रहे’ या घोषणा देत शिवाजी पार्क परिसर दणाणुन सोडला.

‘आपलं महानगर’ च्या व्रुत्तावर शिक्कामोर्तब

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक नेमके कसे असेल अशी उत्सुकता संपुण महाराष्ट्राला लागली होती. बाळासाहेबांच्या या स्मारकाची जागा बुधवारी ट्रस्टच्या हाती देण्यात आली असुन महापौर बंगळ्यात गणेश पूजनाचा कार्यक्रम पार पडला. ८ नोव्हेंबर रोजी सगळ्यात आधी ‘आपलं महानगर’ ने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक नेमके कसे असेल याचे व्रुत्त दिले होते. यामध्ये हे स्मारक बांधताना महापौर बंगळ्याच्या वास्तुला कसलाही धक्का न लावता बांधले जाणार याची माहिती दिली होती. अखेर या व्रुत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.ट्रस्टचे विश्वस्त आणि वास्तू विशारद शशी प्रभू यांनी महापौर बंगळ्याच्या हेरीटेज वास्तुला हात न लावता अंडक ग्राऊंड काम करण्यात असल्याची माहिती ‘आपलं महानगर’ शी बोलताना दिली आहे. तसेच महापौर बंगळ्यातील झाडांनाही हात न लावता बाळासाहेबांना आवडनारी झाडेदेखील नव्याने लावण्यात येतील असे ते म्हणाले. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या कामाला आता खर्या अर्थाने सुरुवात होत असून आता ट्रस्टचे विश्वस्त आणि वास्तू विशारद अशा दुहेरी भूमिका पार पाडाव्या लागणार आहेत असे म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -