घरमहाराष्ट्रसेनेचा भगवा रंग कायम

सेनेचा भगवा रंग कायम

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचे स्पष्टीकरण

गेली पंचवीस वर्षे विरोधात होतो. त्यांच्यासोबत मी सरकार स्थापन केले. पण याचा अर्थ असा नाही की मी भगवा खाली ठेवला. अजिबात नाही. शिवसेनेचा भगवा रंग बदलेला नाही. आमच्या अंतरंगातील भगवा बदलेला नाही. आमचा रंग भगवाच राहणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत केली.तसेच भाजपवर निशाणा साधताना मला खोटे पाडणार्‍यांना मी सोडणार नाही, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे असून जनतेशी कधीही खोटे बोलणार नाही. मी डरणारा नाही तर लढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिली.

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या वचनाची पूर्ती झाल्याने शिवसेनेचे मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी यांनी वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राउंडवर केले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी वरील इशारा दिला. यावेळी ज्येष्ठ ११ शिवसैनिकांच्याहस्ते उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. तर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची महिला शिवसैनिकांतर्फे पारंपारिक पद्धतीने ओटी भरण्यात आली. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा सत्कार अनिल परब यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वचन ते वचनपूर्तीचा प्रवास ध्वनीचित्रीफितीच्या माध्यमातून मांडण्यात आला.

- Advertisement -

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, माझा सत्कार करण्यात आला. पण मी मनापासून सांगतो. ही नवी जबाबदारी घेतल्यानंतर मी एकही सत्कार स्वीकारला नाही, असे जाहीर केले होते. पण मी हा सत्कार मुद्दाम स्वीकारला. कारण हा सत्कार माझा नाही, हा सत्कार तुमचा आहे. मी नक्कीच तुमचा कुटुंब प्रमुख, सेनापती आहे. मैदानात उतरल्यानंतर जी जबाबदारी माझ्यावर येईल त्यापासून मी कधीही पळ काढलेला नाही किंवा काढणार नाही, आतापर्यंतच्या ज्या शिवसैनिकांनी शिवसेनेला मोठे करण्यात खस्ता काढल्या. ज्यांनी बलिदान दिले. ज्यांनी रक्त सांडले, त्यांना हा सत्कार मी समर्पित करतो.

भाजपला लक्ष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, २०१४ साली आम्ही वेगळेच लढलो होतो.तेव्हा अदृश्य हाताच्या मदतीने तुम्ही सरकार स्थापन केले.आमचा खरा चेहरा उघड झाल्याचा ते आरोप करतात यांचे तर सगळेच आता उघड झाले आहे.आज 23 जानेवारी मला सर्व जुने 23 जानेवारी आठवतात. हाच तो दिवस गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी जे आपल्या निशाणीमध्ये दिसत आहेत. एका हातात रुद्राक्षाची माळ दुसर्‍या हातात शिवबंधन ते बांधून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली तो हाच दिवस. आज सत्काराच्या निमित्ताने जो तुम्ही अप्रतिम सोहळा साजरा केला. पण ही माझी वचनपूर्ती नाही. तर त्या वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेले हे माझे पहिले पाऊल आहे.

- Advertisement -

दिग्गज कलाकारांची मांदियाळी
या वचनपूर्तीच्या कार्यक्रमानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपले कार्यक्रम सादर केले. जवळपास ३० कलाकारांनी यावेळी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. ज्यात शंकर महादेवन, अवधुत गुप्ते, अभिजित केळकर, मयुरेश पेम, बेला शेंडे, सुबोध भावे, अजय – अतुल सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, श्रेयस तळपदे यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -