शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांचे निधन

नुकतीच कोरोनावर मात केली होती

Shiv Sena corporator Sunil Surve passes away
शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांचे निधन

कोरोनावर मात करून स्वगृही परतलेले जेष्ठ शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांचे आज सायंकाळी निधन झाले आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाने उल्हासनगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. नुकतीच त्यांनी कोरोनावर मात केली होती.

मागच्या महिन्यात सुनील सुर्वे हे कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. त्यावर त्यांनी मात केली. मात्र त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमीजास्त होत असल्याने ते ऑक्सिजनची लहान बॉटल घेऊन फिरत होते. त्यात त्यांना किडनीचा आणि काही वर्षांपूर्वी बायपास सर्जरी झाल्याने श्वासनाचा त्रास होऊ लागल्याने सुर्वे यांना मॅक्स लाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची प्राणज्योत मावळली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे,महापौर लिलाबाई आशान,सभागृहनेते राजेंद्र चौधरी,जेष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर, धनंजय बोडारे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी शोक व्यक्त केला आहे. यावेळेस सुनील सुर्वे हे उल्हास स्टेशन मराठा सेक्शन परिसरातून महापौर लिलाबाई आशान, नगरसेवक शेखर यादव,नगरसेविका मिताली चानपूर यांच्यासोबत निवडून आले होते.