घरमहाराष्ट्रशिवसेनेच्या धवलसिंह मोहिते पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट

शिवसेनेच्या धवलसिंह मोहिते पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट

Subscribe

रणजितसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे सहसंपर्क नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे सहसंपर्क नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. एकीकडे रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करत असतानाच धवलसिंह यांनी मुंबईत पवारांची भेट घेतली. त्यामुळे आता माढा मतदारसंघात पुन्हा एकदा भाऊबंदकीचा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, माढ्यातून राष्ट्रवादीचे तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. धवलसिंह हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे तर माजी सहकार राज्यमंत्री दिवंगत प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत.

भेटीतील चर्चा गुलदस्त्यात

मुंबईत डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यात भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, जी वेळ साधत धवलसिंह यांनी पवारांची भेट घेतली. त्यावरुन सोलापूरच्या राजकारणात वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. तर, आता राष्ट्रवादीकडून धवलसिंह यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले जाईल का? अशीही चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

अकलुजमधील ताकदीचा युवा नेता 

धवलसिंह मोहिते पाटील यांची अकलुजमधील मोठी ताकद असलेला युवा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सोलापूर जिल्हा परिषदमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केलेले असून अनेक संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे धवलसिंह हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे असून रणजीतसिंह मोहिते पाटलांचे चुलत बंधू आहेत. मात्र, सध्या या दोन्ही भावांमध्ये कौटुंबिक वाद असल्यामुळे हे ऐकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच, पुतण्याला जवळ करण्यात हातखंडा असलेल्या पवारांच्या हाताला आणखी एक पुतण्या भेटल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -