शिवसेना नेत्याच्या कारला भीषण अपघात

- दुचाकीस्वार ठार

Mumbai

सोलापूरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते दिलीप माने यांच्या गाडीला अपघात झाला असून या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला आहे. माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ हा अपघात झाला. माजी आमदार दिलीप माने सहकुटुंब म्हसवडच्या सिद्धनाथ दर्शनासाठी जात होते. तेव्हा त्यांच्या इनोव्हा कारला अपघात झाला.

कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणार्‍या दुचाकीस्वाराला धडक दिली. हा अपघात इतक भीषण होता की, कारच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. तर दुचाकीस्वार हा दूरपर्यंत फेकला गेला. या अपघातात दुचाकीस्वार शहाजी राऊत यांचा मृत्यू झाला. तर दिलीप माने आणि त्यांचे कुटुंबीय सुखरूप आहे.

पंढरपूर-मोहोळ मार्गावर सलग दुसर्‍या दिवशी भीषण अपघात झाला आहे. इश्वरवठार फाट्याजवळ मंगळवारी मध्यरात्री हा अपघात घडला. स्विफ्ट कार आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात सांगोल्याचा युवक जागीच ठार झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here