घरमहाराष्ट्रअखेर शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांची पक्षाला सोडचिठ्ठी

अखेर शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांची पक्षाला सोडचिठ्ठी

Subscribe

चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार सुरेश नारायण उर्फ बाळू धानोरकर यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार सुरेश नारायण उर्फ बाळू धानोरकर यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. राज्यात आणि केंद्रात सेना सत्तेत असूनही पूर्व विदर्भाच्या कार्यकर्त्यांना सेनेच्याच मंत्र्यांकडून अतिशय वाईट वागणूक दिली जाते, असा थेट आरोप बाळू धानोरकर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. पक्षप्रमुख व जिल्हाध्यक्ष अनिल धानोरकर यांच्याकडे बाळू धानोरकर यांनी राजीनामा पाठविला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे स्थानिक नेते त्यांना काँग्रेसकडून चंद्रपूर लोकसभा निवडणूकीची उमेदवारी मिळावी म्हणून दिल्लीत प्रयत्न करत होते. मात्र यात त्यांना यश आले नाही. आता काँग्रेसची मिळो अथवा नाही. निवडणूक लढण्याची आपली पूर्ण तयारी झालेली आहे. शिवसेनेकडून ते शक्य नाही म्हणून आपण आमदारकी व शिवसेना पदाचा राजीनामा दिल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का

ऐन निवडणुकांच्या तोंडावर धानोरकर यांनी राजीनामा दिल्यामुळे शिवसेनेतील आमदारांची नाराजी चव्हाट्यावर आली आहे. नागपूरमधील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना आमदार धानोरकर यांनी शिवसेना मंत्र्यांचेच वाभाडे काढले होते. शिवसेनेचे विदर्भात संघटन नाही हे माहिती असतानासुद्धा पक्षाचा एकही मंत्री या भागाकडे लक्ष देत नाही. मग पक्ष कसा वाढेल, असा सवाल त्यांनी त्यावेळी केला होता. शिवसेनेचे मंत्री शिवसैनिकांचीच कामे करीत नाहीत. त्यामुळे सत्ता असूनही सेना विदर्भात मागे राहिली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -