घरमहाराष्ट्रपुणे महापौर, उपमहापौर निवडीत दिसली महाविकासआघाडी

पुणे महापौर, उपमहापौर निवडीत दिसली महाविकासआघाडी

Subscribe

शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश कदम यांना मतदान करुन पुणे महापालिकेत महाशिवआघाडी झाल्याचे स्पष्ट केले आहे.

पुण्याच्या महापौरपदी भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांची शुक्रवारी निवड झाली. तर उपमहापौरपदी भाजपच्या नगरसेविका सरस्वती शेंडगे यांची निवड झाली. पण पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतही राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाचे पडसाद पडले. शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश कदम यांना मतदान करुन पुणे महापालिकेत महाशिवआघाडी झाल्याचे स्पष्ट केले आहे.

युतीनंतर शिवसेनेचा पालिकेतील निर्णय प्रक्रियेत सहभाग

भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष तीन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढले होते. शिवसेनेला दहा जागांवर समाधान मानावे लागले तर भाजपने ९९ चा आकडा गाठला. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर अडीच वर्ष शिवसेनेने विरोधी पक्षाप्रमाणेच भूमिका बजाविली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिकेतील निर्णय प्रक्रियेत भाजपच्या बाजूनेच मतदान केले होते.

- Advertisement -

महापौर निवडीत दिसली महाआघाडी

आता विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरण बदलले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचे सरकार राज्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमिवर महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले होते. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश कदम यांना मतदान केल्याने पुण्यातही आता या तीन पक्षांची आघाडी झाल्याचे स्पष्ट झाले.

आमच्या पक्षाच्या संपर्क नेत्यांनी दिलेल्या सूचनानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले आहे.
पृथ्वीराज सुतार, पुणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -