घरमहाराष्ट्रशिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी केली मारहाण

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी केली मारहाण

Subscribe

नेत्याचे अपमान केल्यामुळे मारहाण केल्याची दानवे यांनी दिली माहिती.

शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मोर्चा दरम्यान मराठा आंदोलकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवीगाळ केल्यामुळे ही मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. मात्र दानवे यांनी आरोपांना फेटाळले आहे. मी फक्त आगांवर धावून गेलो आणि गळा पकडला असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. यावेळी औरंगाबाद येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण होते. दरम्यान एका आंदोलकाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खालच्या पातळीवर शिव्या दिल्या. त्यामुळे मारहाण करण्यात आली असल्याचे सांगितले.

माझ्ये नेत्याचा अपमान सहन करणार नाही

“मी एक शिवसैनिक आहे. आंदोलनाच्या सुरुवाती पासून मी सहभागी आहे. पक्षाच्या सुरुवातीपासून कार्यकर्ता आहे. मराठा समाजाला सर्वात प्रथम पाठिंबा देणारे नेते हे उद्धव ठाकरे आहेत. त्यांनाच खालच्या दर्जेच्या शिवीगाळ करणे मला पटले नाही. मी ही मराठा समाजाचाच कार्यकर्ता आहे. मराठा समाजाचा असल्यामुळे कोणाचाही अवमान मी सहन करु शकत नाही. मला त्या व्यक्तीबाबत ही द्वेष नाही. मात्र मराठा मोर्चाचा फायदा घेण्यासाठी अन्य समाचे लोकही मोर्च्यात सामिल होतात. मोर्चात सामिल झाल्यानंतर अशा प्रकारचे कृत्य करुन मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. मात्र मी ते होऊ देणार नाही. माझ्या समोर माझ्या नेत्याचा अवमान मी सहन करुन घेणार नाही आणि अस जर कोण करत असेल मी ते खपवून घेणार नाही.”-अंबादास दानवे

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांचे भाषण

निवडणूक आल्यानंतर जुमले दिले जातात मात्र नंतर काही होत नाही. मराठा, कुनबी किंवा धनगर समाज असो अशा अनेक समाजाला हे सरकार काहीच देऊ शकले नाही. त्यामुळे ही लोक रस्त्यावर उतरली याला जवाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -