घरमहाराष्ट्र"अजित पवार, मस्ती तुझीच जिरली" शिवाजीराव आढळरावांच पलटवार

“अजित पवार, मस्ती तुझीच जिरली” शिवाजीराव आढळरावांच पलटवार

Subscribe

पुण्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसाठी नेहमीच हाय व्होल्टेज राहिला आहे. गेल्या तीन निवडणुकांपासून शिरूर ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी कसोशीने प्रयत्न करत होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला मतदारसंघ काबीज करण्यात यश आले. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. “पराभव झाल्यामुळे शिवाजीरावांची मस्ती जिरली”, असे वक्तव्य अजित पवारांनी केले होते. त्याला उत्तर देताना अजित पवार यांचीच मस्ती जिरली असल्याचे शिवाजीराव म्हणाले आहेत.

“शिवाजीराव म्हणाले की, माझा चेहरा काळवंडलेला नाही. मला अजित पवार नावाच्या वाचाळ माणसाला सांगायचे आहे की, महाराष्ट्रातल्या शेबंड्या मुलालाही कुणाची जिरली आहे, हे माहीत आहे. अजित पवारला स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नाही. ज्या ठिकाणी त्यांच्या मुलाचा पराभव झाला त्याच ठिकाणी ते माझ्याविरोधात टिका करतायत, हेच हास्यास्पद असून अजित पवारांकडून चांगल्या वक्तव्यांची अपेक्षा नसल्याचे शिवाजीराव म्हणाले आहेत.”

- Advertisement -

अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही तेव्हा चेहरा कुणाचा काळवंडलाय हे अख्या महाराष्ट्रानं पाहिलंय!● मी राजकारणात स्वतःच्या हिमतीवर आलोय, माझे चुलते मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री नव्हते● बांदल, मोहिते हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे. मारामाऱ्या, दंगली तुम्ही घडवायच्या, जमीन व्यवहारातून लोकांची फसवणूक तुम्ही करायची, खंडणी तुम्ही गोळा करायची आणि पोलिसांनी कारवाई केल्यावर नाव आढळराव पाटलांच घ्यायचं? हे कुठलं राजकारण?शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची सडेतोड भूमिका…..

Shivajirao Adhalrao Patil ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜುಲೈ 19, 2019

 

- Advertisement -

माझा पराभव छत्रपती संभाजी महाराजांमुळे

माझा पराभव झाला असला तरी तो राष्ट्रवादीमुळे झालेला नाही. राष्ट्रवादीमध्ये माझा पराभव करण्याची हिमंत नाही. तीन वेळा राष्ट्रवादीच्या नाकावर टीच्चून मी जिंकून आलेलो आहे. माझा पराभव हा छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेमुळे झाला आहे. छल-कपट हा राष्ट्रवादीचा स्थायी भाव आहे. माझ्या पराभवाची मला चिंता नाही, माझे स्थान जनतेच्या हृदयात आहे.

अजित पवार केवळ तोडांच्या वाफा सोडतात

पार्थ पवारचा मावळमधून पराभव झाला तर मी राजकारण सोडेल अशा वल्गना अजित पवार यांनी केल्या होत्या. मात्र पराभव होऊनही त्यांनी काही राजकारण सोडलेले नाही. अजित पवार हे काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचाच पक्ष फोडणार होते. कुणाच्याही उपकाराची जाणीव न ठेवणाऱ्या अशा माणसाने मला मस्ती जिरविण्याबाबत सांगू नये, असेही शिवाजीराव पाटील म्हणाले. जर राष्ट्रवादीचे नेते मला आव्हान देत असतील तर मी त्या आव्हानाला घाबरणार नाही, असेही प्रतिआव्हान शिवाजीरावांनी यावेळी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -