घरताज्या घडामोडीछत्रपती शिवेंद्रराजे भोसले मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल

Subscribe

भाजपाचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजी भोसले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

भाजपाचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजी भोसले यांची प्रकृती बुधवारी रात्री अचानक बिघडली. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने साताऱ्याच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नेमके काय घडले?

आमदार छत्रपती शिवेंद्र राजे भोसले बुधवारी त्यांच्या ‘सुरुची’ बंगल्यावर होते. त्यावेळी त्यांना अचानक रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना कुटुंबियांनी साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयामध्ये दाखल केले होते. तसेच त्यांची आता प्रकृती ठीक असून त्यांना चांगले वाटल्यास घरी सोडणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Video शिवजन्मोत्सव; सोलापुरात १० हजार माता-भगिनींच्या उपस्थितीत पाळणा सोहळा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -