घरमहाराष्ट्रहुतात्मांच्या जन्मभूमीत बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना

हुतात्मांच्या जन्मभूमीत बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना

Subscribe

शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आयोध्येमध्ये जाण्याची घोषणा केली ज्याचं अवघ्या देशातील शिवसैनिकांकडून कौतुक होत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मभूमीत आज हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरीला पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. राजगुरुनगर येथील शिवसेना शाखेमध्ये हिंदुऱ्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी खेडचे आमदार सुरेश गोरे, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर,महिला जिल्हाध्यक्ष विजया शिंदे,गणेश सांडभोर,सुरेश चव्हाण, दिलीप तापकिर,नगरसेविका सारीका घुमटकर,संगिता तनपुरे,लक्ष्मणराव जाधव,एल.बी.तनपुरे,शंकर दाते,सुनिल टाकळकर,कैलास गोपाळे,  महेंद्र घोलप,सर्पमित्र निलेश वाघमारे यांच्यासह अन्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी  नेहमीच शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे. आज बाळासाहेब ठाकरे जरी आपल्यात नसले तरी त्यांनी घालून दिलेला वारसा हा आजही आमच्यात जिवंत असल्याचं शिवसैनिकांनी यावेळी सांगितलं.

वाचा: कायद्याने राममंदिर बांधा; अन्यथा परिस्थीती चिघळेल

यावेळी तिथे उपस्थित आमदार गोरे यांनी बाळासाहेब ठाकरे विषयींच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. गोरे म्हणाले, की ‘राम मंदिर वही बनवायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे” या पध्दतीने भारतीय जनता पक्षाने हिदूंना झुलवत ठेवले आहे. बाबरी मशिदीचा ढाचा पाडला त्यावेळी अनेक हिदूं संघटना एकवटल्या होत्या. मात्र, कोणीच जबाबदारी स्वीकारली नव्हती. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी मात्र ही मशिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान असल्याचे ठासून सांगितले होते. मुख्य म्हणजे बाळासाहेब त्यांच्या या वक्तव्यावर ठाम राहिले आणि कधी मागे हटले नाहीत.’ तसंच शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आयोध्येमध्ये जाण्याची घोषणा केली ज्याचं अवघ्या देशातील शिवसैनिकांकडून कौतुक होत असल्याचंही गोरे यांनी यावेळी सांगितलं.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -