शिवसेनेच्या संसदीय पक्षनेतेपदी खा. विनायक राऊत

Mumbai
MP Vinayak Raut
खासदार विनायक राऊत

लोकसभेतील शिवसेनेच्या संसदीय पक्षनेतेपदी विनायक राऊत यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही नियुक्ती केली असून त्यासंदर्भातील पत्रही संसदीय कामकाज मंत्र्यांना दिले आहे. त्यात त्यांनी खा. विनायक राऊत यांची पक्षातर्फे संसदीय पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याचे म्हटले आहे.

कोकणात नारायण राणेंचा राजकीय गड उध्वस्त करण्यामध्ये खासदार विनायक राऊत यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. खासदार विनायक राऊत, राज्यमंत्री दिपक केसरकर आणि वैभव नाईक यांनी राणेंचे गड उध्वस्त करत तळकोकणासह शिवसेनेचा एक दबदबा तयार केला आहे. त्यामुळे राजकीयदृष्टया पराभूत झालेल्या राणेंना कोकणात आणखी डॅमेज करायचे असेल, तर विनायक राऊत यांना पद देण्यात यावे, अशी शिवसेनेची धारणा होती. त्याच धारणेतून मध्यंतरी त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात येईल अशीही चर्चा होती. मात्र सध्या तरी त्यांना संसदीय पक्षनेते पद बहाल केल्याचे दिसत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here