घरमहाराष्ट्रमविआतर्फे विधानपरिषद मतदारसंघासाठी ५ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

मविआतर्फे विधानपरिषद मतदारसंघासाठी ५ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

Subscribe

महाविकास आघाडीतर्फे पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून पाच अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत असल्याचे संयुक्त जाहीर प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेकडून श्रीकांत देशपांडे, पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अरुण लाड, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण, पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रा. जयंत आसगांवकर तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे.

तरी या अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे सुभाष देसाई आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

mlc election
मविआतर्फे अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -