घरताज्या घडामोडी'सुशांत प्रकरणावरुन राजकारण करणं घृणास्पद'

‘सुशांत प्रकरणावरुन राजकारण करणं घृणास्पद’

Subscribe

'बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण करणे घृणास्पद आहे', असा हल्लाबोल्ल शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

‘बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण करणे घृणास्पद आहे. तसेच सुशांतप्रकरणी अनेकजण पड्यामागून हालचाली करत असल्याची माहिती हाती मिळाली आहे. त्यामुळे सुशांत प्रकरणाच राजकारण सुरु’, असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

मुंबई पोलिसांनी पूर्ण तपास करावा

‘मुंबई पोलीस हे एक उत्तम पोलीस दल आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे, त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणाचा तपास पूर्ण करावा’, असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांबाबत अपमानास्पद बोलणे चुकीचे असून नेत्यांबद्दल अपमानास्पद बोलणं सहन करणार नाही’, असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंशी संबंध जोडणे चुकीचे 

‘या प्रकरणात ज्या बॉलीवूड कलाकारांची नावे येत आहेत त्यातील बहुतेक ‘डी’ ग्रेड मंडळी आहेत. अनेक वर्षे ती पडद्यावर दिसत नाहीत आणि इतर व्यवसाय करून ते जगत आहेत. यातील काही लोकांचा आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क आला म्हणून जे कुणी जमिनीवर काठ्या आपटत असतील तर ते चुकीचे आहे. या प्रकरणात सरकारविरोधी पक्षाने महाराष्ट्रापेक्षा बिहार पोलिसांची बाजू घेणे हा प्रकार धक्कादायक आहे. बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसात आहेत. तसेच त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली हे माझे अनुमान आहे’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.


हेही वाचा – Sushant Sucide Case : मुंबई पोलिसांनी तपास लांबवला – संजय राऊत


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -