‘सामना’मधून संजय राऊत यांची राज ठाकरेंना साद

shivsena mp sanjay raut appeal to mns chief raj thackeray
'सामना'मधून संजय राऊत यांची राज ठाकरेंना साद

मुंबईवर ताबा मिळवायचं कारस्थान सुरू असून त्या विरोधात मराठी माणसानं एक होण्याची वेळ आली आहे, असं सामनाच्या रोखठोकमध्ये म्हणतं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहेत. मुंबईतून याचं ब्रँडना नष्ट करायचं आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळावायचा हे कारस्थान उघडे पडल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरे हे सुद्धा ठाकरे ब्रँडचे घटक आहेत. या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. जरी शिवसेनेशी त्यांचे मतभेद असेल तरी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा, असं म्हणतं संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना साद घातली आहे. तसेच ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचं पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचं पतन व्हायला सुरुवात होईल, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

नक्की काय म्हटले आहे सामनाच्या रोखठोकमधून?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात ‘मुंबईचे खच्चीकरण कोणासाठी! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची!!’हा लेख लिहिला आहे. यामध्ये राऊत यांनी ठाकरे ब्रँडचा उल्लेख करत राज ठाकरे यांना भावनिक साद घातली आहे. या लेखात असं म्हटलं आहे की, ‘मुंबईस पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असं बोलणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहाराच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय रजपूत, क्षत्रिय मते मिळविण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाली तरी चालेल. हे धोरण राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्यांना शोभणारे नाही. महाराष्ट्राचा अवमान केला म्हणून दिल्लीतील एकाही मराठी केंद्रीय मंत्र्यास वाईट वाटले नाही, तेथे संतापून राजीनामा वगैरे देण्याची बातच सोडा.’

‘ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाचं नष्ट करायचं व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हे सुद्धा त्याच ब्रँडचा एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचं पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचं पतन व्हायला सुरुवात होईल.’


हेही वाचा – कंगनाने पातळी सोडली, मुख्यमंत्र्यांना दिली रावणाची उपमा!