घरताज्या घडामोडीसरकारमध्ये नाराजी असली तरीही सरकार टिकणार - संजय राऊत

सरकारमध्ये नाराजी असली तरीही सरकार टिकणार – संजय राऊत

Subscribe

'संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराजी ही असतेच. इथे चक्क तीन पक्षांचे मिळून सरकार आहे. त्यामुळे नाराजीही असणारच', असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

‘संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराजी ही असतेच. इथे चक्क तीन पक्षांचे मिळून सरकार आहे. त्यामुळे नाराजीही असणारच आहे. त्यात काही मंत्र्यांची तर काही आमदारांची नाराजी असते. तर अनेकांची व्यक्तीगत आणि मानपानाची नाराजी असते. पण, तरीही सरकार टिकेल’, असा ठाम विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्यात २८ नोव्हेंबर रोजी ‘ठाकरे’ म्हणजेच महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने सामानाच्या रोखठोक सदरात लिहिलेल्या लेखात त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

‘गेल्या एक वर्षात विरोधकांकडून घेतले जाणारे आक्षेप आणि केल्या जाणाऱ्या भाकितांचाही त्यांनी समाचार घेतला आहे. ‘भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची निवडणूकपूर्व युती असूनही आणि दोघांचे मिळून १७० पारची बेरीज होऊनही सरकार वेगळ्याच तिघांचे बनले, जे तिघे निकालाआधी एकमेकांचे राजकीय वैरीच होते. तरीही त्या तिघांचे सरकार बनले. ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर टिकले हे महत्त्वाचे. भारतीय जनता पक्षाचे स्वत:चे आणि इतर मिळून ११२ आमदार असूनही त्यांना विरोधी बाकांवर बसावे लागले. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने महाविकास आघाडीचे सरकार अनैसर्गिक आहे. अनैसर्गिक सरकार लवकरच पडेल असे त्यांचे भाकीत आहे. पण, ते कसे पडेल, कोण पाडेल हे सर्व गुप्त कारवाया आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांवर अवलंबून आहे. ‘ईडी’सारख्या संस्थांनी स्वत:चे सत्त्व गुंडाळून मालकाचे हुकूम पाळायचे ठरवले तरी महाराष्ट्राचे सरकार टिकून राहिल हे मी जबाबदारीने सांगते’.

- Advertisement -

राजकारणात कोणी साधुसंत नसतो

महाराष्ट्रातील सध्याचे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे नेते सांगतात. राजकारणात कुणी साधुसंत वगैरे नसतो. तसे कोणतेही सरकार है नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसते. जोपर्यंत एखादे सरकार टिकून आहे तोपर्यंत नैसर्गिक न्यायाचेच असते.

अनैसर्गिक वाटणारे सरकार नैसर्गिक झाले

सध्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी सी.बी.आय., ईडीसारख्या यंत्रणांचा वापर सुरु आहे. बेकायदेशीर बांधकाम, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे गुन्हे करणाऱ्यांना अभय दिले जात आहे. हे सर्व राजकीय दाबदबावाचे प्रकार न्यायाचे आणि नैसर्गिक तितकेच ‘ठाकरे’ सरकार ही नैसर्गिक मानावेच लागेल. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहे. या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेतील मी एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहे. त्यामुळे सुरुवातीला अनैसर्गिक वाटणारे सरकार आज पूर्ण नैसर्गिक झाले आहे हे मी प्रत्यक्ष पाहतोय.

- Advertisement -

तिघांचे सरकार निसर्गविरोधी कसे

‘अटल बिहारी वाजपेयी यांनी ३३ भिन्न विचारांच्या पक्षांचे ‘एनडीए’ सरकार पाच वर्षे चालवले. त्यात ममता बॅनर्जी होत्या. जयललितांचा पक्षही होता. ते सरकार कुणाला अनैसर्गिक वाटले नाही. मग तिघांचे सरकार निसर्गविरोधी कसे,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

‘हे सरकार किती टिकेल अशी शंका उपस्थित करणाऱ्यांनी अमित शहा यांचे एक प्रगल्भ विधान समजून घेतले पाहिजे. ‘आघाडी सरकारमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यातील एखादा पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही, असं शहा म्हणाले आहेत. हेच सत्य असून एकही पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नाही,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

‘अजित पवार यांच्यावर लक्ष ठेवा असे अलीकडे सातत्याने सांगितले जाते, पण आज सगळ्यात जास्त भरवशाचे तेच आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना कुरतडून काही हाती लागेल काय यावर ऑपरेशन सुरू आहे. संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज असतातच आणि इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. मंत्र्यांची आणि काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे. ती मुख्यमंत्र्यांनाच दूर करावी लागेल,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी कुणाकुणाला धमकावले हे सारा महाराष्ट्र जाणतो


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -