घरमहाराष्ट्रVideo : ...म्हणून शरद पवार संसदेत मोदी यांच्या चेंबरमध्ये गेले होते

Video : …म्हणून शरद पवार संसदेत मोदी यांच्या चेंबरमध्ये गेले होते

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खासदार संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार असून यापूर्वी संजय राऊत हे त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्याचे प्रोमो पोस्ट करत आहेत. आजच्या चौथ्या प्रोमोमध्ये शरद पवार यांनी ‘मी स्वत: तेव्हा संसदेतील नरेंद्र मोदी यांच्या चेंमरमध्ये गेलो होतो, असे मुलाखतीत म्हटले आहे.

- Advertisement -

या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे. तसेच भाजपाच्या हातात सत्ता देणे शिवसेनेच्या हिताचे नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ही मुलाखत शनिवारी प्रसिद्ध होणार आहे. यावेळी त्यांनी पोस्टमध्ये ‘सत्ता ही विनयाने वापरायची असते, शरद पवार यांची जोरदार मुलाखत असे लिहिले आहे.

हेही वाचा –

जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करून चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन – आशिष शेलार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -