घरमहाराष्ट्र'तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी?'

‘तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी?’

Subscribe

कोलकाता येथे झालेल्या सर्वपक्षीय मेळाव्यात सामील झालेल्या नेतेमंडळींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकविरोधी, देशविरोधी आणि चोर म्हटले आहे. मोदींच्या याच वक्तव्यावरुन शिवसेनेने मोदींना 'तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी?', असा प्रश्न विचारला आहे.

‘तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी?’ असा प्रश्न शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. कोलकाता येथे २२ पक्षांची एक महासभा भरली होती. तिथे ‘मोदी सरकार हटाव’ची गर्जना केली गेली. २२ पक्षांच्या प्रमुख नेत्या ममता बॅनर्जी यांनी सर्वांना या सभेचे निमंत्रण दिले होते. या कार्यक्रमात मोदी सरकारची ‘एक्स्पायरी डेट’ संपली असल्याचे सांगितले. या सभेत देवेगौडांपासून शरद पवारांपर्यंत आणि चंद्राबाबूंपासून अखिलेश यादवांपर्यंत अनेक नेते एकाच व्यासपीठावर आले. भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हाही तिथे आले आणि बंडाची ठिणगी टाकून गेले.

‘हे चित्र लोकशाहीला बरे नाही’

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, ‘‘मोदी यांनी कुठेतरी जाऊन तोफेवर बसून एक भाषण केले. तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी? २२ विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजाने ‘तोफ’ का थरथरली? मोदींना हटवायचे की ठेवायचे याचा निर्णय जनता घेईल. भाजप, मोदी सरकारच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवताच शिवसेनाही लोकविरोधी, देशविरोधी होऊ शकते; पण जनतेला सर्व समजते. २२ पक्षांनी एकजुटीचे दर्शन घडविले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या तोफाही गढूळ पाण्याच्या पिचकाऱ्या सोडू लागल्या. हे चित्र लोकशाहीला बरे नाही.’’

- Advertisement -

‘शिवसेनाही लोकविरोधी, देशविरोधी होऊ शकते; पण…’

आज जे नेतेमंडळी मोदी सरकारला विरोध करत आहेत, त्यांच्यातल्या बऱ्याच नेतेमंडळींनी भाजपशी युती केली होती. आज ते मोदी विरोधी आहेत. त्यांनी मोदी हटावची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जींच्या व्यासपीठावर काल जे गेले ते सगळे लोकविरोधी, देशविरोधी किंवा चोर आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावले आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयमाने घ्यावे, असा सल्ला शिवसेनेन मोदींना दिला आहे. त्याचबरोबर शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे की, ‘‘भाजप, मोदी सरकारच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवताच शिवसेनाही लोकविरोधी, देशविरोधी होऊ शकते; पण जनतेला सर्व समजते. २२ पक्षांनी एकजुटीचे दर्शन घडविले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या तोफाही गढूळ पाण्याच्या पिचकाऱ्या सोडू लागल्या. हे चित्र लोकशाहीला बरे नाही, पण सत्ताधारी बेभान झाले की, जे घडते तेच घडताना आम्ही पाहात आहोत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -