घरताज्या घडामोडीबाळासाहेबांची विचारधारा सत्तेसाठी विकली, आणि 'सोनिया' सेना झाली - कंगना

बाळासाहेबांची विचारधारा सत्तेसाठी विकली, आणि ‘सोनिया’ सेना झाली – कंगना

Subscribe

कार्यालयाच्या बांधकामावर केलेली कारवाईनंतर कंगना चांगलीच संतापली आहे. मुंबई आल्यामिनीटापासून तीने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरूच ठेवली आहे. आज पुन्हा एकदा ट्वीट करून तिनं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

कंगनाने ट्विट करत म्हटले आहे की, माझ्या अनुपस्थितीत माझं घर तोडणाऱ्या गुंडांना महापालिकेचं नाव देऊ नका. राज्यघटनेचा इतका मोठा अपमान करू नका, असं कंगनानं म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारधारेवर शिवसेना उभी केली, ती विचारधारा शिवसेनेनं सत्तेसाठी विकली. तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती आणि वारसा देऊ शकतात, पण आदर-सन्मान तुमचा तुम्हालाच मिळवावा लागतो. तुम्ही किती तोंडं बंद करणार? किती जणांचे आवाज दाबणार? कधीपर्यंत तुम्ही सत्यापासून पळणार?,’ अशा प्रश्नांची सरबत्ती कंगनानं केली आहे. ‘तुम्ही आहात कोण? घराणेशाहीचा केवळ एक नमुना आहात,’ असा खोचक टोलाही कंगनानं उद्धव ठाकरे यांना हाणला आहे.

आता कंगनाने आपला मोर्चा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडे वळवला आहे. कंगनाचा मुंबईतील खार परिसरातील डीबी ब्रीझ इमारतीमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटला २०१८ मध्ये मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. यासंदर्भात एका पत्रकाराने ट्विट केलं होतं. यावर उत्तर देताना कंगनाने शरद पवारांकडे बोट दाखवलं. ही इमारत शरद पवारांच्या भागीदाराने बांधल्याचा दावा कंगनाने केला आहे.

- Advertisement -

कंगनाची राणावतची इमारत डीबी रियल्टी बिल्डर्सने बांधली आहे. हे शरद पवार यांचे भागीदाराने बांधली आहे. त्यामुळे ते याला उत्तर देण्यासाठी बांधील असतील, असा दावा कंगनाने केला आहे. “ती नोटीस फक्त मला नव्हती तर संपूर्ण इमारतीला होती. ते प्रकरण फक्त माझ्या फ्लॅटपुरतं नव्हे तर संपूर्ण इमारतीचं आहे. इमारात शरद पवारांशी संबंधीत असून आम्ही त्यांच्या पार्टनरकडून फ्लॅट विकत घेतला आहे. त्यामुळे मी नव्हे तर ते उत्तर देण्यासाठी बांधील आहेत, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -