घरमहाराष्ट्रशिवशाही बसचा भीषण अपघात; एक ठार तर ११ प्रवासी जखमी

शिवशाही बसचा भीषण अपघात; एक ठार तर ११ प्रवासी जखमी

Subscribe

पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला असून अन्य ११ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सोलपूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळ गावाजवळ झाला आहे. या अपघात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव मल्लिकार्जुन आबुसे असं असून जखमी झालेल्या प्रवशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना १ हजार तर मयत मल्लिकार्जुन आंबुसे यांच्या कुटुंबियांना १० हजार रुपयांची मदत एसटी प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात दिली आहे. एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून शिवशाही बस ही सोलापूरकडे भरधाव वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने ही बस अपघातग्रस्त झाली. शिवशाही बसचा या अपघातात चक्काचूर झाला आहे. या बसमध्ये एकूण १६ प्रवासी प्रवास करत होते. या अपघात झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -