घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा नगरसेविकेचे शोले स्टाईल आंदोलन

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा नगरसेविकेचे शोले स्टाईल आंदोलन

Subscribe

प्रभागात पाणी कमी दाबाने येत असल्याने भाजपा नगरसेविकेवर शोले स्टाईल आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

प्रभागात पाणी कमी दाबाने येत असल्याने भाजपा नगरसेविकेवर शोले स्टाईल आंदोलन करण्याची वेळ आली आहे. सुजाता पालांडे असे या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेचे नाव आहे. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्या प्रभागात कमी दाबाने पाणी येत असल्याची तक्रार नागरिक त्यांच्याकडे केली होती. पालांडे यांनी जबाबदारी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळेच सोमवारी पालांडे यांनी टाकीवर जाऊन शोले स्टाईल आंदोलन करण्याची वेळ आली आहे. विशेष बाब म्हणजे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष्याची सत्ता आहे, अशा वेळी एका भाजपा नगरसेविकेला आंदोलन करण्याची वेळ आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisement -

नगरसेविका सुजाता पालांडे यांच्या प्रभाग क्रमांक २० संत तुकाराम नगर, महात्मा फुले नगर या परिसरात गेली सहा दिवस झाले पाणी येतच नाही, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित नगरसेविकेला नागरिकांनी केली होती. या प्रकरणी नगरसेविका सुजाता पालांडे यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र त्यांनी त्यांच्या बोलण्याकडे, सुचनांकडे दुर्लक्ष केले त्यामुळे अखेर नेहरू नगर येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन तीन तास आंदोलन करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर नगरसेविका सुजाता पालांडे यांनी आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा –

बीडीडी चाळींसाठी उगवली नवी पहाट!

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय ‘लेफ्ट हॅण्डर्स डे’ विशेष : डावखुरेच ‘राईट’; नाशकात अभिनव चळवळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -