घरताज्या घडामोडीपुणे : पाचव्या टप्प्यात आजपासून 'या' गोष्टी सुरु

पुणे : पाचव्या टप्प्यात आजपासून ‘या’ गोष्टी सुरु

Subscribe

पुणे शहरात पाचव्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात आले असून काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, पाचव्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. पुणे शहरात देखील पाचव्या टप्प्यातील सवलती जाहीर करण्यात आल्या असून या टप्प्यात पुण्यातील उद्याने, कॅब, व्यापारी क्षेत्र, खाजगी कार्यालये, मंडई, बाजारपेठा असे तीन टप्प्यात सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन आदेशात ६५ ऐवजी ६६ प्रतिबंधित क्षेत्र झाले आहेत. मात्र, अनेक वस्त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत.

आजपासून ‘या’ गोष्टी सुरु होणार

- Advertisement -
  • आजपासून पुण्यात उद्याने पहाटे ५ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
  • महापालिका नवीन आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व दुकाने सुरू होणार आहेत.

मनुष्यबळासह खासगी कार्यालये उघडणार

  • पुण्यात ८ जूनपासून १० टक्के मनुष्यबळासह खासगी कार्यालये उघडणार आहेत.
    उदाहरणार्थ : वकील, सीए यांची कार्यालये उघडण्यात येणार आहेत.

अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने

- Advertisement -
  • प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत सुरू राहणार आहेत.
  • इतर सर्व दुकाने ९ ते ५ वेळेत सुरु राहणार आहेत. तुळशीबाग, हॉंगकॉंग, मंडई लेन पी १, पी २ नुसार ५ जूनपासून सुरू होणार आहेत.
  • पुण्यातील बांधकाम व्यवसायही सुरु होणार आहेत.

हे बंदच राहणार

  • पुण्यात हॉटेल, मॉल, सिनेमागृह, मंदिरे बंदच राहणार आहेत.
  • यादरम्यान सलून आणि ब्युटी पार्लरही बंद राहणार आहेत.

हेही वाचा – Nisarg Cyclone : मुक्या प्राण्यांची मदत करा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -