हिंदुत्ववादी असाल तर राज्यातले सर्व मदरसे बंद करुन दाखवा; अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

showing true hindutva and close all the madrassas in the state atul bhatkhalkar challenged cm

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विचारल्यानंतर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांच्या हिंदुत्वाला आव्हान दिलं आहे. आसाममधील भाजप सरकारने आसामधील सर्व मदरसे बंद करण्याची घोषणा केली आहे. मदरसे बंद करुन दाखवणाऱ्या आसामच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यातील मदरसे बंद करण्याची मागणी केली आहे.

“आसाममधील भाजप सरकारने मदरश्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयावर पाऊल ठेवत राज्याचे मुख्यमंत्री, स्वत:ला हिदुत्ववादी म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सुद्धा राज्य सरकार पुरवत असलेली मदरश्यांना आर्थिक मदत तात्काळ बंद करावी,” अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. याबाबतचं पत्र देखील मुख्यमंत्र्यांना भातखळकर यांनी लिहिलं आहे.

“शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष रिझवी यांनी मदरश्यांमध्ये देशद्रोही प्रकारची कृत्ये चालतात, याची माहिती दिली आहे. ही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागवून त्यादृष्टीने महाराष्ट्रात काही घटना घडत आहेत का? याची चौकशी करावी,” अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

आसाम सरकारने राज्यातील सर्व सरकारी मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरपासून सर्व मदरसे बंद होतील अशी माहिती आसामचे आरोग्य आणि शिक्षणमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी दिली. सरकारी पैशांवर ‘कुराण’चं शिक्षण दिलं जाऊ शकत नाही असं माझं मत आहे, तसं असेल तर मग आपण बायबल आणि गीताही शिकवली पाहिजे असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. “आम्हाला समानता आणायची असल्याने तसंच ही प्रथा थांबवायची असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला,” असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.


हेही वाचा – जलयुक्त शिवार योजनेची चौकशी राजकीय आकसापोटी – चंद्रकांत पाटील