पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह थाटात संपन्न!

'या पंढरपूरात वाजत गाजत सोन्याचे बाशिंग लगीन देवााचं लागलं'...या भक्तीगीतांवर आज पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह थाटात संपन्न झाला आहे.

Pandharpur
Shree vitthal rukmini marriage celebration
पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह थाटात संपन्न

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये वसंत पंचमीचे औचित्य साधून आज श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात, थाटामाटात, अतिशय भक्तीमय आणि जल्लोषात पार पडला. ‘या पंढरपूरात वाजत गाजत सोन्याचे बाशिंग लगीन देवााचं लागलं’…या भक्तीगीतांवर तल्लीन झालेल्या हजारो भाविकांनी आवर्जून हजेरी लावून अक्षता टाकत श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा झाला. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा वसंत पंचमीला विवाह झाल्याची आख्यायिका आहे. या संदर्भाने श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे दरवर्षी मंदिरामध्ये श्री विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा उत्साहात साजरा केला जातो.

असा पार पडला विवाह सोहळा

या विवाह सोहळ्याच्यानिमित्ताने संपूर्ण मंदिर आज आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे. आज दुपारी १२ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा पार पडला आहे. विवाहासाठी श्री रुक्मिणीमातेकडून देवाला पांढरा पोशाख आहेर म्हणून पाठविला जातो तर श्री रुक्मिणीमातेला देवाकडून पैठणी पाठविली जाते. लग्न बोहल्यावर देवाच्या प्रातिनिधिक मूर्ती उभ्या केल्या जातात आणि या दोन मूर्तींच्यामध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टक म्हटल्या जातात.

वऱ्हाडींना दिवसभर जेवण

या लग्नसोहळ्यानंतर मंदिर समितीच्या वतीने लग्न सोहळ्या दरम्यान आलेल्या वऱ्हाडींना जेवणाचे आयोजन केले होते. लग्नाचे औचित्य साधून सायंकाळी पाच वाजता शहरातून मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आजपासून रंगपंचमी पर्यंत देवाला दररोज पांढरा पोशाख केला जाणार आहे. तर या पोशाखावर रोज केशर पाणी आणि गुलाल टाकण्याची देखील परंपरा असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून भागवाचार्य अनुराधा शेटे यांचे श्री रुक्मिणी स्वयंवर हे कथानक ठेवण्यात आले आहे.


वाचा – पंढरपूरच्या विठ्ठलाला सोन्याचा चंद्रहार अर्पण

वाचा – मुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here