घरमहाराष्ट्रमहाराजांविषयी अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम विजयी

महाराजांविषयी अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम विजयी

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम अहमदनगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये २ हजार मतांनी विजयी झाला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधून श्रीपाद छिंदमनं हा विजय मिळवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम अहमदनगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये २ हजार मतांनी विजयी झाला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधून श्रीपाद छिंदमनं हा विजय मिळवला आहे. महाराजांविषयी अपशब्द वापरल्यानंतर श्रीपाद छिंदमची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती. शिवाय त्याला जेलवारी देखील करावी लागली होती. त्यामुळे छिंदमन अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यानं अपक्ष अर्ज भरला. शिवाय, घरोघरी जात प्रचार केला. ओघानं माझ्या तोंडून महाराजांविषयी अपशब्द निघाले, मला माफ करा असं तो मतदारांना घरोघरी जाऊन सांगू लागला. अखेर त्याला मतदारांनी स्वीकारलं असून श्रीपाद छिंदम २ हजार मतांनी विजयी झाला आहे. त्याच्या भावानं मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा केल्यानं देखील मोठा वाद झाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

वाचा – Live Result अहमदनगर महापालिका: शिवसेनेला २२ जागा

दरम्यान, आता श्रीपाद छिंदम कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार हे पाहावं लागणार आहे. नगरमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे अपक्षांचा भाव वाढणार आहे. त्याला भाजप परत पक्षात स्थान देणार का? हे आता पाहावं लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -